घरमहाराष्ट्रभाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले

भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले

Subscribe

भाजपने राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपने डांबून ठेवलेल्या आमदारांच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. ते लवकरच परत येतील असा आमचा विश्वास आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.राष्ट्रवादीचे 50 आमदार आमच्यासोबत आहेत. मात्र त्यातील सर्व आमदार आमच्यासोबत हॉटेलमध्ये नाहीत. यातील 4 आमदारांना भाजपने दुसरीकडे कुठेतरी डांबून ठेवलं आहे.

आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. ते लवकरच परत येतील असा आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदारांना रेनिसाँस हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व आमदारांना हॉटेल हयातमध्ये हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. भाजप नेते आशिष शेलार यांनी आमचा आमच्या आमदारांवर आणि त्यांचा आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना कुठेही एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. आमदारांवर विश्वास नसल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली आहे, असा टोला लगावला

- Advertisement -

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमदार फुटू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी बाळगली जात आहे. यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटेलच्या शेजारी असलेल्या द लेमन ट्री या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्व आमदार रेनिसन्स हॉटेलमध्ये आहेत. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणात्सव हयात हॉटेलमध्ये मुक्काम करण्यास सांगितले आहे. तर काँग्रेसचे सर्व आमदार जे.डब्ल्यू मॅरेट या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -