Homeमहाराष्ट्रPankja Munde on CM Post : भाजप आमदारांकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकच नाव; पंकजा...

Pankja Munde on CM Post : भाजप आमदारांकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकच नाव; पंकजा मुंडे म्हणाल्या असं…

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रात महायुतीचे सरकार गुरुवारी स्थापन होणार आहे. त्याआधी आज भारतीय जनता पक्षाचा गटनेता निवडला जात आहे. यासाठी भाजपचे सर्व आमदार विधान भवानात दाखल झाले आहेत. सेंट्रल हॉलमध्ये भाजप गटनेता निवडीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या प्रत्येक आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नाही.

सेंट्रल हॉलमध्ये भगवे वातावरण 

भारतीय जनता पक्षाचा गटनेता निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. सुधीर मुनगुंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे गटनेता निवडीचा प्रस्ताव मांडणार आहेत. आमदार हात उंचावून त्यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देणार आहेत. भाजपचे विधानसभेत 130 हून अधिक आमदार विजयी झाले आहेत. हे सर्व आमदार आज सेंट्रल हॉलमध्य जमा झाले. सर्व आमदारांना भगवे फेटे बांधलेले आहेत. सेंट्रल हॉलमध्ये भगवे वातावरण दिसून येत होते. देवेंद्र फडणवीस हे भगवे जॅकेट परिधान करुन बैठकीसाठी उपस्थित आहेत.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ? 

भाजपच्या गटनेता निवडीच्या बैठकीसाठी भाजपचे आमदार विधान भवनात येत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न त्यांना विचारला जात होता. त्यावर सर्वच आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला. विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना देखील पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. त्यावर पंकजा मुंडे यांनी मात्र फडणवीसांचे नाव न घेता, ‘थोड्याच वेळात बैठक आहे’, असे एका वाक्यात उत्तर दिले. पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.

2014 ते 2019 काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे या जलसंपदा मंत्री होत्या. त्यावेळी त्यांनी अनेकदा जाहीर सभांमधून मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे म्हटले होते. यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा होती. आज जेव्हा फडणवीसांची पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची वेळ येत आहे, तेव्हा पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार आहेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळते का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis : फडणवीस कोणाच्या बाजूने उभे राहणार? ठाकरे गटाचा भावी मुख्यमंत्र्यांना रोखठोक सवाल

Edited by – Unmesh Khandale