राज्यसभा निवडणूक भाजपाने लादली – सतेज पाटील

BJP imposed Rajya Sabha elections, said Satej Patil
राज्यसभा निवडणूक भाजपाने लादली - सतेज पाटील

राज्यसभा निवडणूक भाजपाने लादली आहे. भाजपाने माघार घेऊन सकारात्मक टाकायला हवे होते, असे गृहराज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले.मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तसेच राज्यसभा निवडणूक याविषयी सांगितले.

महाविकास आघाडीकडे नंबर्स आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभा निवडणुकीत निवडून येणार आहेत. कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हे 100 टक्के निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाने ही निवडणूक लादली आहे. त्यांनी माघार घेऊन एक सकारात्मक पाऊल टाकायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही, अशी टीका यावेळी सतेज पाटील यांनी केली. इम्रान प्रतापगढी राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत. भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रबळपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सतेज पाटील म्हणाले

राज्यात महाविकास आघाडीत कुरबुरी असून काँग्रेस नाराज असल्याची चर्चांना उत्तर देताना काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही. भाजपाला रोखण्यासाठी तीन पक्ष एकत्र आहेत. महाविकास आघाडीचा काँग्रेस एक भाग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करेल. या सरकारला कुठलाही धोका नाही. किंबहुना भाजपाची मते बाजूला जातील. भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत.