घरमहाराष्ट्रसोलापूर महापालिकेत भाजपने गड राखला

सोलापूर महापालिकेत भाजपने गड राखला

Subscribe

महापौरपदी श्रीकांचना यन्नम, उपमहापौरपदी राजेश काळे

सोलापूर महानगरपालिकेत भाजपने आपला गड कायम राखला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीत राज्यात झालेल्या महाआघाडीप्रमाणे महापालिकेतदेखील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडीचा केलेले प्रयोजन अखेरच्या क्षणी फसले. एमआयएमने तटस्थ राहत महापौर-उपमहापौर निवडीत उमेदवार उभे केले. सर्व विरोधकांची गोची झाली.

त्यातच शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने शिवसेनेचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले तर एका नगरसेवकाने आणि बसपाच्या एका नगरसेविकेने भाजपच्या पारड्यात मते टाकल्याने महापौर-उपमहापौरपदाची बिकट असलेली वाट सहज आणि सोपी झाली. झालेल्या निवडणुकीत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीकांचना यन्नम आणि उपमहापौरपदी राजेश काळे भरघोस मतांनी विजयी झाले.

- Advertisement -

महापौर पदासाठी भाजपच्या श्रीकांचना यन्नम , शिवसेनेच्या सारिका पिसे,काँग्रेसच्या फिरदोस पटेल, एमआयएमच्या शाहिदाबानो शेख यांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये शिवसेनेच्या सारिका पिसे,काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपच्या यन्नम आणि एमआयएमच्या शेख यांच्यात सरळ लढत झाली.हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांना ४९ मते मिळणे अपेक्षित असताना २ मते अधिक मिळवून तब्बल ५१ मते घेऊन एमआयएमच्या शेख यांचा पराभव केला.

शेख यांना ८ मते मिळाली. शिवसेनेचे राजकुमार हंचाटे यांनी पक्षादेश झुगारून भाजपला मतदान केले. तर बसपाच्या स्वाती आवळे यांनीदेखील आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले. त्यामुळे यन्नम यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना , माकप आणि वंचित आघाडीच्या सदस्यांनी तटस्थ राहणे पसंत केले.

- Advertisement -

पीठासीन अधिकारी बुचकळ्यात

महापौर निवडीच्यावेळी ९८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र, उपमहापौर निवडीच्यावेळी शिवसेनेचे देवेन्द्र कोठे आणि गुरूशांत धुत्तरगावकर यांनी वाकाऊट केल्याने उपमहापौर निवडीत ९६ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. उमेदवारांना पडलेली मते,तटस्थ असलेली संख्या तसेच सभागृहातील संख्या यांची आकडेमोड करताना पीठासीन अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. दोन सदस्यांचे मतदान मतदान कसे कमी झाले यावरून अधिकारी बुचकळ्यात पडले.पीठासीन अधिकार्‍यांनी पुन्हा सभागृहात शीर गणती करत खातरजमा केली असता सेनेचे दोघे सदस्य मतदान न करता बाहेर गेल्याचे दिसून आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -