घरमहाराष्ट्रसंकटकाळातही विरोधकांकडून राजकारण सुरु; नवाब मलिकांची टीका

संकटकाळातही विरोधकांकडून राजकारण सुरु; नवाब मलिकांची टीका

Subscribe

लॉकडाऊन करायचा असेल तर सर्वांच्या खात्यात पैसे टाका अशी मागणी करणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा लॉकडाऊन लावताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही. कोणाच्याही खात्यात पैसे टाकण्याचा कार्यक्रम केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी विविधी मागण्या करत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

राज्यातील जनतेचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचं असेल तो निर्णय राज्य सरकार घेईल. भाजपच्या पॅकेज जाहीर करण्याच्या मुद्द्यावर बोलताना मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला. पॅकेज जाहीर करुन कर्जबाजारी व्हा, असं पंतप्रधान मोदी म्हणतात. लॉकडाऊनमध्ये राज्याने गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. फडणवीस ज्या गुजरातचं उदाहरण देत आहेत, त्या गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे, हे त्यांनी पाहिली पाहिजे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम सुरु आहे, त्याचं कौतुक मोदी करत आहेत. आयसीएमआर कौतुक करत आहे, असं नलाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये राम भरोसे कारभार सुरु आहे. चाचण्या तर होतच नाहीत. RT-PCR चाचण्या केल्या जात नाही आहेत. ९० टक्के कुठेतरी अँटीजेन टेस्ट करत आहेत. जर त्यांनी व्यवस्थित टेस्टिंग केली, तर परिस्थिती वेगळी होऊ शकते असं मलिक म्हणाले. महाराष्ट्रातून जेव्हा मजूर त्यांच्या राज्यात गेले तेव्हा महाराष्ट्र सरकार जिंदाबाद, मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा देत होते. तिथे गेल्यावर तिथल्या सरकारचा निषेध करत होते, हे भाजपवाल्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं मलिक म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -