घरमहाराष्ट्र'जंतराव' न कळणारी लबाडी करा म्हणत चित्रा वाघ यांचे जयंत पाटलांना चोख...

‘जंतराव’ न कळणारी लबाडी करा म्हणत चित्रा वाघ यांचे जयंत पाटलांना चोख उत्तर

Subscribe

'शिवसेनेत जी बंडाळी झाली ती शिवेसेने कधीच केली नव्हती तर त्यामागे भाजप होतं असंही जयंत पाटील म्हणले. यावरच आता भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. अशातच ‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने(bjp) केले’ असा आरोपच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटीलकोल्हापुरात माध्यमांशी बोलताना भाजपवर केली. ‘शिवसेनेत (shivsena) जी बंडाळी झाली ती शिवेसेने कधीच केली नव्हती तर त्यामागे भाजप होतं असंही जयंत पाटील म्हणले. यावरच आता भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला.

या सगळ्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, “जंतराव… निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. या संदर्भांत चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विटसुद्धा केले आहे. “भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” असं चित्रा वाघ (chitra wagh) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत जयंत पाटील(jayant patil) यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपने केले

- Advertisement -

एकनाथ शिंदे (eknath shinde) जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. “आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतं. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील. उद्धव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार आहे असं असतानाही निवडणूक आयोग असा निर्णय घेतो हे प्लॅनिंगने सुरू आहे’. असंही जयंत पाटील म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे – फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हे ही वाचा – विचारांची धगधगती मशाल घेऊन सज्ज व्हा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आवाहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -