घरताज्या घडामोडीज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक

ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मी मोदींना मारू शकतो, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पहायला मिळाले. परंतु आता नाना पटोलेंनी मोदींबाबत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केल्यानंतर त्यांची दुसरी क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात नागपूरात आंदोलन करण्यात आलं आहे.

सात कोटी महिलांचा अपमान

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना त्यांना लाज वाटत नाहीये. जे पंतप्रधान संपूर्ण जगामध्ये नंबर १ चे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट बोलत आहात. सात कोटी महिलांचा अपमान केला आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

नाना पटोलेंना आम्ही सोडणार नाही

ज्यांची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात असं वक्तव्य करणाऱ्या पटोलेंचं डोकं फिरलं असून त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. तसेच नाना पटोलेंना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी दिलाय.

ज्यांची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात असं म्हणत त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. पीएम मोदींबाबत ते अतिशय वाईट बोलले असून आम्ही त्यांना सोडणार नाही. तसेच महाराष्ट्रभर आम्ही नाना पोटोलेंच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत, असं देखील बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले नाना पटोले ?

देशाची बेराजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. छोटे उद्योजक आणि व्यापारांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. केंद्रातील सरकार फेल झालेलं सरकार आहे. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं असं हे झाल्यानंतर काय बाकी राहीलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी लागवला. पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशारा त्यांनी दिला.

नाना पटोले यांनी आज नाशिकमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले. ‘ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते’, असे पटोले म्हणाले. या विधानावरून भाजप आक्रमक झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आपण याचा निषेध करतो.

मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

नागपूरमध्ये आंदोलन

दरम्यान, पटोले यांचा निषेध म्हणून आज नागपूरमध्ये भाजपच्यावतीने पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.


हेही वाचा : PV Sindhu : पीव्ही सिंधूने पटकावलं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद, मालविका ठरली उपविजेती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -