घरट्रेंडिंग"दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार''; ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना...

“दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार”; ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला

Subscribe

"माफिया पोलीस कमिश्नर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार ना'', असा नवा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

“माफिया पोलीस कमिश्नर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार ना”, असा नवा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. किरीट सोमय्या हे काही महिन्यांपासून सातत्याने संजय राऊतांचा पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. तसेच, संजय राऊतांवर आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल करत होते. त्यानुसार, पुन्हा एकदा ईडीने राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नवा आरोप करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. (bjp kirit somaiya allegation that shiv sena mp sanjay raut meet some peoples in dubai)

“माफिया पोलीस आयुक्त संजय पांडेनंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचाळ 1200 कोटींचा घोटाळा, वसई-नायगाव 2000 कोटींचा युरीटेक-बल्ब घोटाळा, अलिबागमध्ये जमिनी, मुंबई, दादरमध्ये फ्लॅट सदनिका, विदेश दौरा, चीन दौरा, दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार ना, तेव्हा खात्री आहे आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिकांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊतांना मिळेल”, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत सध्या दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरी जाऊन चौकशी केली. तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेतले. सध्या ईडीकडून त्यांची कारवाई सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे राऊतांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीने चौकशी सुरू केल्यापासून संजय राऊतांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानाबाहेर घराबाहेर शिवसैनिक आंदोलन करत आहेत. राऊतांच्या समर्थनात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तसेच, “आम्ही राऊतांना घेवून जावू देणार नाही”, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैत्री बंगल्याबाहेर तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा…; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -