घरमहाराष्ट्रसुनील धामणेंची हकालपट्टी करा, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा; किरीट सोमय्यांची मागणी

सुनील धामणेंची हकालपट्टी करा, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा; किरीट सोमय्यांची मागणी

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा कोरोना काळात मुंबई महापालिकेने रेमडेसिवीरचा काळा बाजार केल्याचा आरोप केला आहे. यासह शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारवर रेमडेसिवीरचा काळा बाजार केल्याचे आरोप केले आहेत.

सुजित पाटकर यांनी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला जे पार्टनरशिप डिड दिले तसेच त्यांच्याबरोबर जो वेगळा जुलै २०२१ मध्ये करार केला व अन्य २१ टेंडर अप्लिकेशन केले त्या सगळ्यांमध्ये ही पार्टनरशिप डिड रजिस्टर आहे असे म्हंटले आहे. परंतु ३० डिसेंबर, २०२१ रोजी निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र सरकार याने लिखित कळवले की, सुजित पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी ही रजिस्टर कंपनी नाही, नोंदणीकृत नाही. महाराष्ट्रात नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही भागीदारी फर्म ह्यांच्याशी कुठल्याही सरकारी संस्थेला करार करता येत नाही, त्यांना कोणतेही काम टेंडर देता येत नाही, म्हणत सोमय्यांनी सुजित पाटकरांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

- Advertisement -

भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले की, त्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये आझाद मैदान एस्प्लानेड कोर्ट येथे याचिका दाखल केली. कोर्टाने आझाद मैदान पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिकेने यासाठी सहआयुक्त सुनील धामणे यांची मे महिन्यात दोन सदस्यांची समिती नेमली. या समितीने आपला जो अहवाल दिला त्यात सुजित पाटकर लाइफलाईन सर्विसेसने अश्या प्रकारची फोर्जरी, फसवणूक, चीटिंग केली असल्याचे आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हंटले आहे. हा अहवाल आझाद मैदान पोलीस स्टेशन व आझाद मैदान न्यायालयात सुपूर्त करण्यात आला, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेचे अधिकारी सुनील धामणे हे सुजित पाटकर व लाइफलाईन सर्व्हिसेस यांनी फसवणूक, फोर्जरी केली आहे. बोगस स्टॅम्प पेपर वापरला आहे, नोटरीच्या सह्या खोट्या पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहे. एका करारवर नोव्हेंबर २०१० मध्ये रजिस्ट्रेशन झाले तर दुसऱ्या करारावर २६ जून २०२० रोजी रजिस्ट्रेशन झाले असे स्पष्टपणे म्हंटले आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

सोमय्या पुढे म्हणाले की, महापालिकेच्या अहवालात असे स्पष्टपणे म्हंटले आहे की भागीदारी संस्था २६ जून २०२० नंतर अस्तित्वात आली. ज्या कंपनीचा जन्म झाला नव्हता, त्याचा काही अनुभव नाही, बँक अकाऊंट नाही, जीएसटी नाही, इन्कमटॅक्स नंबर नाही अशा कंपनीला मुंबई महानगरपालिकेने रु. १०० कोटींचे कोविड सेंटरचे कॉन्ट्राक्ट दिले. अशा बोगस संस्थेला पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांनी शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर पुणे याचा कोट्यावधी रुपयांचा कॉन्ट्राक्ट दिला या कंपनी मुळे पुणे येथील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये ३ कोविड पेशंटचे मृत्यू झाले, असा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने अशा बोगस संस्थेला कसे काय कॉन्ट्राक्ट दिला, त्यांचा रिपोर्ट मध्ये सिद्ध झाल्यानंतर ही मुंबई महानगरपालिकेनी या संबंधी कारवाई केली नाही म्हणून मुंबई पोलिसांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी भाजपा डॉ. किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी बोगस डुप्लिकेट स्टॅम्प पेपर वापरून अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने मुंबई महानगरपालिकेकडून रु. १०० कोटींचे कोविड सेंटर कॉन्ट्राक्ट मिळविले. असा आरोप करत सोमय्या पुढे म्हणाल की, सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीच्या नावाने स्टॅम्प पेपर क्र. AY136973 आणि AY136974 या दोन स्टॅम्प पेपरचा फोर्जरी करून या दोन्ही स्टॅम्प पेपरवर एकदा नाही तर दोनदा पार्टनरशिप डिडचे करार केल्याचे आता मुंबई महापालिका व पोलिसांना आढळले आहे. या फोर्जरी, फ्रॉड, चीटिंगची आता मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक (IGR Stamps) म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याने पण चौकशी सुरु केली आहे. याच स्टॅम्प पेपरवर मुंबई महानगरपालिकेशी करार करण्यात आला, याच स्टॅम्प पेपरचा वापर करून पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) शी पण कोविड सेंटरचा करार करण्यात आला. एकच स्टॅम्प पेपर अनेकवेळा वापरण्यात आल्याचे आता लक्षात आले आहे या संबंधात आता महाराष्ट्राच्या स्टॅम्प अधिक्षक यांनी ही चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात लवकरच एफआयआर होण्याची शक्यता आहे असे भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

आश्चर्यचीबाब अशी आहे की, या सगळ्या करारावर जी नोटरी करण्यात आली आहे ती ही बोगस, फोर्जरी आहे. मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या पार्टनरशिप डिड वर २० नोव्हेंबर २०१० तारखेला पार्टनरने सह्या केल्या आहेत. तसेच, त्याला श्री. राकेश टूडा या परळ येथील नोटरीने प्रमाणित (certified) केले आहे असे सुजित पाटकर यांनी मुंबई महानगरपालिकेला सांगितले. याच स्टॅम्प पेपरवर म्हणजे AY136974 वर त्या भागीदाराच्या सह्या व करार आहे त्यावर २६ जून २०२० ची सही आहे हा करार पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ला देण्यात आले यावर ही परळ येथील नोटरी राकेश टूडा याची सही असल्याचे आढळले, या नोटरी संबंधी चौकशी केल्यावर या नोटरीने ह्या तारखेला अश्या प्रकारचे कोणतेही सर्टिफिकेट सही केलेली नाही, कोणताही करार ऑथेन्टिकेट (Authenticate) केलेला नाही, असा गंभीर आरोपही गौप्यस्फोट सोमय्यांनी केला आहे.


ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून हटवले; कुस्तीपटूंचे आंदोलन मागे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -