घरमहाराष्ट्रविश्वास नांगरे पाटील अडचणीत? सोमय्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

विश्वास नांगरे पाटील अडचणीत? सोमय्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

Subscribe

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकासमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांविरोधात घोटाळ्याचे आरोप केले होते. याच प्रकरणी किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी जाणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकरणावरून आता आत्ता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

अशातच आता मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आपल्या पदाचा गैरवापर करुन महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करीत आहेत, याच द्वेषातून त्यांनी मला सहा तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांविरोधात आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत सोमय्यांनी म्हटले की, कोल्हापूरला जात असताना मला मुंबईत रोखले तसेच मला घरात डांबून ठेवण्यात आले, यात घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे.

- Advertisement -

यावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असेल , त्यासंदर्भात सर्वप्रथम राज्य सरकारला विचारणा करुन कृती अहवाल मागविला जाईल अशी माहिती दिली आहे.

डॉ. मुळे पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत पोहचली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडेही येऊ शकते. परंतु एका शासकीय अधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला काय कारवाई झाली याबाबच अहवाल मागितला जाईल त्यांनतरचं प्रकरण आयोगाकडून हाताळले जाईल.

- Advertisement -

दरम्यान सोमय्या यांनी दिल्लीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील घोटाळ्याची माहिती दिली. मुश्रीफ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या जावयाला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -