घरताज्या घडामोडी"...अब तेरा क्या होगा कालिया?" किरीट सोमय्यांचा अनिल परब आणि ठाकरेंना सवाल

“…अब तेरा क्या होगा कालिया?” किरीट सोमय्यांचा अनिल परब आणि ठाकरेंना सवाल

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. अब तेरा क्या होगा कालिया म्हणत सोमय्यांनी टोला लगावला.

१०० कोटी वसुलीप्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) काल ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. तसेच, सचिन वाझे (Sachin Vaze) माफीचा साक्षीदार बनल्याने महाविकास आघाडीसमोरील टेन्शन वाढलं आहे. त्यातच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. अब तेरा क्या होगा कालिया म्हणत सोमय्यांनी टोला लगावला.

अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना किरीट सोमय्या म्हणाले की, “मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो, अब तेरा क्या होगा कालिया…अनिल परब यांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरेंचीही झोप उडाली असेल. उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती केली होती. सचिन वाझेकडून आलेला १०० कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता. अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?”

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या संदर्भातही किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना इतकी भीती का वाटते? स्वतःच्या पक्षाचे आणि मित्रपक्षाचे आमदार विकले जाऊ शकतात असा आरोप संजय राऊत करत आहेत, देवेंद्र फडणवीस नाही. बेईमान कोण आहे…शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते?”

- Advertisement -

१०० कोटी वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सीबीआय कोर्टात (CBI court) सुनावणी सुरू होती. मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सचिन वाझे (Sachin Vaze) याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २५ मे रोजी झालेल्या सुनावणीत सीबीआयने त्याचा अर्ज स्विकारला. तसेच, १ जूनला न्यायालायनेही अर्जावर आदेश देत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -