घरमहाराष्ट्रअंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् कोल्हापुरातील माझ्या कामाची माहिती घ्यावी; सोमय्यांच्या आव्हानाला मुश्रीफांचे प्रत्युत्तर

अंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् कोल्हापुरातील माझ्या कामाची माहिती घ्यावी; सोमय्यांच्या आव्हानाला मुश्रीफांचे प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात जाण्याची घोषणा करत, मला आता अडवून दाखवा, असं खुलं आव्हान मुश्रीफांना दिले होते. सोमय्यांच्या या आव्हानाला आता हसन मुश्रीफ यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात यावं, अंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् त्यांनी जिल्ह्यातील माझ्या कामाची माहिती घ्यावी, असं खोचक वक्तव्य मुश्रीफांनी केलं आहे.

यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, माझ्या घरावर तीन वेळा छापेमारी करण्यात आली. त्यावेळी काही मिळाले नाही. आताही छापा पडणार याची माहिती चार दिवस आधीच मिळाली होती. छापा टाकणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा काही दोष नाही. सरकारी अधिकारी कोणाच्यातरी सांगण्यावरून येतात. या मागे कोण? यात जाऊन कुणाला डिवचून काही वाद करायचा नाही असे ते म्हणाले.

- Advertisement -

सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कार्यकर्ते अडवणार नाहीत. कोल्हापुरात येऊन त्यांनी कामाची माहिती घ्यावी. माझ्या सार्वजनिक जीवनाची माहिती घ्यावी, माझे कार्यकर्ते मंदिराकडे जाणार नाहीत. कार्यकर्त्यांना जाऊ नये असे आवाहन करतो, त्यांनी जरूर कोल्हापुरात यावं आणि दर्शन घेऊन जावं, असा सल्लाही मुश्रीफ यांनी सोमय्याना दिला आहे. त्यांना डिवचून काही अर्थ नाही. मी खुली किताब आहे. सर्वांना माहित आहे. मी काही चुकीचं केलं नसेल तर मला खचून जाण्याचं कारण नाही, असही मुश्रीफ म्हणाले.

सोमय्यांचे हसन मुश्राफांना पुन्हा आव्हान

दरम्यान मुश्रीफांच्या प्रत्युत्तरावर आता पुन्हा सोमय्यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. सोमय्या म्हणाले की, मिया मुश्रीफमध्ये आडवण्याची आणि थांबवण्याची ताकद राहिली आहे का? मुश्रीफ म्हणाले होते की, मुस्लीम आहे म्हणून माझ्याकडून त्यांना टार्गेट केले जात आहे. पण मागच्यावेळी पण मला अंबाबाईच्या दर्शनासाठी रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा काय परिस्थिती झाली होती, त्यामुळे आता पुन्हा हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं म्हणत सोमय्यांनी मुश्रीफांना इशारा दिला आहे.


‘हिंदकेसरी’ अभिजीत कटकेच्या प्रशिक्षणासाठी भानगिरेंनी दिला 2 लाखाचा धनादेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -