शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर फडणवीसही नॉटरिचेबल; ठरवतायत रणनीती

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली

bjp leader and opposition leader devendra fadnavis not reachable for media

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतच असून ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पुढील रणनिती आखण्यासाठी बैठकांचे सपाटा सुरु केला आहे. त्यचावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मीडियापासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या मार्फत आता शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेसाठी नवी रणनीती आखली जात आहे. त्यामुळे फडणवीसांचा मुंबईतील सागर बंगला हा नव्या सत्ता स्थापनेचा केंद्र बिंदु ठरला आहे.

सरकारमधील वाढत्या हालचाली पाहता आता फडणवीसांकडून सावध पावलं उचलली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांसाठी नॉट रिचेबल असल्याचे दिसतेय. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घडमोडींवर भाष्य करणारे फडणवीसांनी शिवसेना आमदारांच्या बंडखोरीवर एकही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच ट्विटही केले नाही. यामुळे फडणवीस सध्या सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रणनीती आखत असल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीस आपल्या विश्वासू सहकाऱ्यांनसोबत सत्ता स्थापनेसाठी नवीन खेळी आखत आहेत. फडणवीसांचा अजित पवारांसोबतचा सत्ता स्थापनेचा प्रयोग फसल्याने ते आता कोणतीही रिक्स घेऊ इच्छित नाही. यामुळे शिंदे गटासोबतच्या सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून पूर्वनियोजन केले जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान त्यांनी बाळगले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर काही तासांनी फडणवीस दिल्लीत दाखल होत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. या भेटीतही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि भाजपच्या सत्ता स्थापनेवरील रणनितीवर चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिल्लीतून मिळालेली रणनिती आपल्या काही विश्वासू सहकाऱ्यांना घेऊन फडणवीस राज्यातील सत्ता पाडण्यासाठी चालवत असल्याची चर्चा आहे.


शिवसेनेचे ६ आमदार नॉट रिचेबल, मुख्यमंत्र्यांची पुन्हा महत्त्वाची बैठक