ST Workers Strike: शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत – अनिल बोंडे

bjp leader anil bonde demands president rule after st workers protest sharad pawar silver oak residence outside
ST Workers Strike: शरद पवारांचे वाईट सुरू झालेत - अनिल बोंडे

राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी पवारांच्या निवासस्थानाच्या परिसरात चप्पलफेक आणि दगडफेक केली. जवळपास अर्धा तास हा सगळा गोंधळ सिल्व्हर ओकच्या परिसरात सुरू होता. मग मुंबई पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. यादरम्यान भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असून शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत, अशी टीका केली आहे.

या घटनेनंतर अनिल बोंडे ट्वीट करून म्हणाले की, ‘शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहेत. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळाली. शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे राज्यात माझीच सुरक्षा नाही तर जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी.’

‘गेल्या पाच महिन्यांपासून संतप्त एसटीचे कामगार संपावर आहेत. ते आज संतप्तरित्या शरद पवारांच्या घरात घुसले आणि पोलिसांनाही जुमानले नाही. कारण पाच महिन्यांपासून पगार नसणारे हे कामगार आहेत, किराणा न मिळणारे कामगार आहेत, २१५ आत्महत्या झालेले हे कामगार आहेत. त्यांचे दुःख त्यांना माहित. पण दुर्दैवानी शरद पवारांचे सरकार इतके अहंकारात गेलेले आहे की, अनिल परबांनी म्हटले, पाच महिन्यांच्या संपाचा काय फायदा झाला? तिकडे संजय राऊत ईडीची नोटीस येते म्हणून स्वतःचेच स्वागत करून घेतात. नवाब मलिकांचे त्या देशद्रोहीसोबत संबंध असताना हे सांगतात की, आम्ही राजीनामा घेणार नाही. यामुळेच संपूर्ण जनता खवळली आहे,’ असे अनिल बोंडे म्हणाले.


हेही वाचा – ST Workers Protest: सिल्व्हर ओक हल्ल्यावर निलेश राणेंची बोचरी टीका, आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर…