घरताज्या घडामोडी१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात - आशिष शेलार

१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात – आशिष शेलार

Subscribe

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता १०वी, १२वीची परीक्षांंच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात असे मत भाजपा आमदार Adv. आशिष शेलार यांनी आज मांडले.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे १०वी, १२वीच्या परीक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार Adv. आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी आमदार आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, ‘कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे.’

- Advertisement -

‘सध्याच्या स्थितीमध्ये परीक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आमदार Adv आशिष शेलार यांनी मंत्र्यांना सूचित केले.

आशिष शेलार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी देखील १०वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढच्या पाच दिवसांत १०वी, १२वी परीक्षांबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. आज वर्षा गायकवाड यांच्यासोबत सर्व आमदारांची बैठक पार पडली.

- Advertisement -


हेही वाचा – महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -