घरताज्या घडामोडीआशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चेबाबत शेलारांनी दिली प्रतिक्रिया

आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चेबाबत शेलारांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त भेट घेतली असून राज ठाकरेंना गिफ्ट दिलं असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्री संबंध चांगले आहेत. अनेकवेळा आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र यावेळी शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचल्यावर राजकीय वर्तुळात युतीची चर्चा सुरु झाली होती. या चर्चांना आशिष शेलारांनी पूर्णविराम दिला आहे.

दिवाळी सणाच्या निमित्त भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. शेलारांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी राज ठाकरेंच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्यांना दिवाळीच्या निमित्त एक पुस्तक भेट दिलं असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच पुस्तकाबाबत शेलार म्हणाले की, राज ठाकरेंना छानसं पुस्तक दिलं. जे पेंग्विन पब्लिकेशनचे आहे. पुस्तकाचे नाव “द बुक ऑन मुवी” जगभरातील १०० अशा प्रसिद्ध चित्रपटांवर असलेलं पेंग्विन पब्लिकेशनचं पुस्तक मी पाहिले होते, मला आवडले होते. दिवाळीनिमित्त त्यांना भेटून ते पुस्तक दिलं. त्यांच्या तब्येतीबाबत विचारले आणि ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीनिमित्त होती यामुळे इतर कोणती चर्चा झाली नाही. असे आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या घरात राहायला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांचे नवे घर हे आता दादरमधील असलेल्या कृष्णकुंज शेजारीच आहे. कृष्णकुंजच्या शेजारीच ५ मजल्याची नवी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर कुटुंबासह प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांच्या नव्या इमारतीला अद्याप नाव देण्यात आले नाही त्यामुळे नव्या इमारतीला काय नाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : Corona : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ५ व्यक्तींना कोरोनाची लागण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -