Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी तुम्हीही कार्यक्रम करा, तुम्हाला कुणी आडवलंय?, महानाट्याच्या आयोजनावरून शेलारांचा विरोधकांना सवाल

तुम्हीही कार्यक्रम करा, तुम्हाला कुणी आडवलंय?, महानाट्याच्या आयोजनावरून शेलारांचा विरोधकांना सवाल

Subscribe

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईत विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करण्यात येत आहे. यावेळी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर भाजपकडून ‘जाणता राजा’ या महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, तुम्हीही कार्यक्रम करा, तुम्हाला कुणी आडवलंय?, असा सवाल उपस्थित करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील सण-उत्सव हे जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आले. यामध्ये मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे एक महानाट्य, जे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलंय. १४ ते १९ मार्च या दरम्यानच्या काळात शिवाजी पार्क येथे रोज सायंकाळी ६.४५ वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका मुंबईकरांसाठी विनामूल्य ठेवण्यात आल्या आहेत, असं आमदार आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

या कार्यक्रमाचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. ज्यांना कार्यक्रम करायचे असतील ते करू शकतात. आम्ही कुणालाच थांबवलेलं नाही. तुमचे हात कुणी बांदले आहेत. लोकांना आनंद, सेवा द्यायला तुम्हाला कुणी थांबवलंय?, असं म्हणत आशिष शेलार यांनी विरोधकांवर टीका केली.


हेही वाचा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत आमचे चुकले!


- Advertisement -

 

- Advertisment -