Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल- अतुल भातखळकर

सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवर ढकलेल- अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी सर्वांना मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर ही लस राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहचेल यासंदर्भात आज भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आणि इतर भाजपा नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार पावसाची जबाबदारी सुद्धा बहुतेक मोदींवर ढकलतील आणि म्हणतील मोदींनीच यातून मार्ग काढावा. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे. अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. तसेच मुंबईच्या आयुक्तांना सांगतो की, भष्ट्राचार कमी करून आता तरी नालेसफाई नीट करा. असे म्हणत मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर भष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत.

तसेच आज भाजपाच्या लसीकरणासंदर्भात झालेल्या बैठकीविषयी बोलताना भातखळकर म्हणाले की, मुंबई महानगपालिकेच्या चर्चेपेक्षा सेवा हीच संघटन या ब्रीद वाक्याला अनुसरून कोरोना काळात किती मुले अनाथ झाली आहेत हे वार्ड निहाय आकडेवारी घेत आहोत. तसेच शेवटच्या घटकापर्यंत लस कशी पोहचवता येईल यासाठी अधिकाधिक कॅम्प लावणे त्यासाठी व्यवस्था निर्माण कर यासंदर्भातील विचार आजच्या बैठकीत झाला. असे त्यांनी सांगितले.


‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री


- Advertisement -

 

- Advertisement -