घरताज्या घडामोडीरॅपर राम मुंगासेच्या अटकेवरून अतुल भातखळकर व रोहित पवार आमनेसामने

रॅपर राम मुंगासेच्या अटकेवरून अतुल भातखळकर व रोहित पवार आमनेसामने

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर रॅपर राम मुंगासे याने गाणं गायले होते. मात्र त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर रॅपर राम मुंगासे याने गाणं गायले होते. मात्र त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. (bjp leader atul bhatkhalkar slams ncp rohit pawar comment on ram mungase arrest)

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. “संताप हा विकार आहे आणि रोहित पवारांनी त्यावर विजय मिळवला आहे. त्यांना तो त्यांच्या सोयीने व इच्छेने कधी कधी येतो. केतकी चितळेच्या वेळी आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला”, असे अतुल भातखळकर म्हणाले.

- Advertisement -

रोहित पवार काय म्हणाले होते?

- Advertisement -

“आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळे अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचे कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे”, असे रोहित पवार म्हणाले.

मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी एक-एक करत बंड केला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. सध्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.

रॅपमध्ये काय?

राम मुंगासेच्या रॅपचे बोल असे आहेत, ‘चोर आले. चोर आले…चोर आले.. एकदम ओके होऊन, कसे बघा चोर आले. पन्नास खोके घेऊन किती चोर आले. एकदम ओके होऊन. अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा, ह्यांनी पाठीवर दिला आपल्या घाव बघा. गेले सुरत गुवाहट्टी अन् गोवा कसे ढोसली दारू, अन म्हणला हा डाव बघा, अरे पळकुटे चोर झाले, छातीमध्ये छप्पन चोरलास छप्पन चोरलास पक्ष हयांनी चोरतील बाप पण आळया पडुन पडतील हा महाराष्ट्राचा श्राप आहे. मराठी माणुस हा सगळ्यांचा बाप आहे. चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले. एकदम ओक होऊन कसे बघा चोर आले’, असा उल्लेख रॅपमध्ये आहे.


हेही वाचा – कोरोना वाढतोय, पण सरकारला गांभीर्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -