घरताज्या घडामोडीविरोधकांनी हिरोइन शब्दाचे भांडवल करू नये; लोणीकरांची सारवासारव

विरोधकांनी हिरोइन शब्दाचे भांडवल करू नये; लोणीकरांची सारवासारव

Subscribe

बबनराव यांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीकेची झोड उठली आहे.

महिला तहसीलदारांचा ‘हिरोईन’ असा उल्लेख केल्यामुळे चहुबाजून टीका होऊ लागल्यानंतर माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदाराबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सारवासारव केली आहे. हिरोईन शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असे मला म्हणायचे होते. तहसीलदारांबद्दल हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचे भांडवलं करु नये, असे बबनराव लोणीकर यांनी सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधकांची बबनराव लोणीकरांवर टीकेची झोड

जालना येथील परतूर तालुक्यातील एका गावातील विद्युत केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात भाषण करताना त्यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिला तहसीलदार रुपा चित्रक यांचा ‘हिरोईन’ असा उल्लेख केला होता. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू असे वक्तव्य लोणीकरांनी केले होते. तसेच स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईन सारख्याच दिसतात असे देखील बबनराव लोणीकर म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. अखेर लोणीकर यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

तहसीलदार मॅडमची हात जोडून माफी मागावी – सक्षणा सलगर

दरम्यान भाजपची संस्कृती रसातळाला गेली असून, बबनराव लोणीकरांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याची टीका राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे. तसेच मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणा आणि मोर्चा मोठा करा, असे लोणीकरांनी म्हटले हेही चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्यात. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चाचे उद्दीष्ट काय आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मोर्चाला शेतकरी आणा. मात्र भाजपच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत, म्हणून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जात असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी लोणीकर यांनी महाराष्ट्राची आणि तहसीलदार मॅडमची हात जोडून माफी मागावी असे म्हणत लोणीकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


हेही वाचा – तहसीलदार मॅडम ‘हिरोईन’च आहेत – बबनराव लोणीकर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -