घरताज्या घडामोडीतहसीलदार मॅडम 'हिरोईन'च आहेत - बबनराव लोणीकर

तहसीलदार मॅडम ‘हिरोईन’च आहेत – बबनराव लोणीकर

Subscribe

बबनराव लोणीकर यांची विद्युत केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात भाषण करताना जीभ घसरली.

माजी पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी महिला तहसीलदारांचा ‘हिरोईन’ असा उल्लेख केला आहे. जालनातील परतूर तालुक्यातील एका गावातील विद्युत केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात भाषण करताना त्यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिला तहसीलदार रुपा चित्रक यांचा ‘हिरोईन’ असा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू असं वक्तव्य लोणीकरांनी केलं आहे. तसंच स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईन सारख्याचं दिसतात असं देखील बबनराव लोणीकर म्हणाले. त्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाले बबनराव लोणीकर?

‘जर २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतुरला करायचा का? तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि जर अधिवेशनाच्या आधी मोर्चा झाला तर २५ हजार लोक आणू, ५० हजार लोक आणूया. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसांना आणा, चंद्रकांतदादा पाटलांना आणा, तुम्ही सांगा सुधीरभाऊंना आणा. तुम्हाला वाटलं तर सांगा. नाहीतर एखादी हिरोईन आणू आणि नाही कोणी भेटलं तर तहसीदार मॅडम हिरोईनच आहेत’, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

- Advertisement -

लोणीकरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे – विद्या चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी बबनराव लोणीकर यांचा निषेध करत त्या असं म्हणाल्या की, ‘भाजपची संस्कृती रसातळाला गेली आहे. आपल्या मोर्चाला गर्दी जमावण्यासाठी एका महिलेला आणा किंवा हिरोईनला आणा आणि ते जर नसेल तर तहसीदार मॅडम आहेत, असं बोलणं लज्जास्पद आहे. समस्त महिला जातीचा हा अपमान आहे. जी महिला एका अधिकार पदावरती आहे त्या महिलेला जाहीरपणे हिरोईन बोलणं, ही त्यांची मानसिकत आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.


हेही वाचा – ‘हिंदू-मुस्लिमांना जड जाणारा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -