Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र येत्या पंधरवड्यात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील- चंद्रकांत पाटील

येत्या पंधरवड्यात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील- चंद्रकांत पाटील

सरकारमधील संघटीत गुन्हेगारी अनिल परब, देशमुखांविरोधात मोक्का लावा

Related Story

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात अटक आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राजकारणात खळबळ उडाली आहे. या पत्रात शिवसेना नेते, राज्य मंत्री अनिल परब यांचा उल्लेख आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणावरून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर तीव्र शब्दात टीका करत सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा येत्या पंधरा दिवसात राजीनामा होणार असा दावा केला आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, चला मी आज नवीन घोषणा करतो की, १५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणार आहेत. छापा. मग ते झाल्यानंतर पुन्हा म्हणा, की यांना कसे कळले, हे अमित भाईंशी बोलतात का? एनआयएशी बोलतात का? सगळ्या प्रकारच्या माहित्या यांना कशा मिळतात? असो हा कॉमन मॅनचा अंदाज आहे की अजून दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. असेही पाटील म्हणाले.

”मनसुख हिरेन आत्महत्या किंवा काही हत्येचा विषय निघाल्यानंतर वाझेंना तुम्ही निलंबित करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी लावून धरली. सस्पेंडवरून आम्ही लॉंग लिव्हवर आलो, लॉंग लिव्हवरून आम्ही पदावरून दूर करापर्यंत आलो, नऊ वेळा विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढे प्रेम तुमचे वाझेंवर प्रचंड. एक मिनिट विधानसभेचे काम ठप्प होणे म्हणजे काही करोड काही लाख रुपयांचे नुकसान. अख्खा दिवस सदन चालले नाही. त्यादिवशी मात्र गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी घोषणा केली. अनिल परबांचे म्हणणे आहे की, एका मंत्र्याचे नाव येणार आहे तुम्हाला कसे कळले वैगरे वैगरे, त्याची सुरूवात तिथे आहे की दुसऱ्या दिवशी नऊ वेळा सभागृह स्थगित झाले, दिवसभरासाठी सभागृह स्थगित झाले. तरी काही तुम्ही केले नाही इतके वाझे तुमचे प्रिय, त्या वाझेंवर तुमचा अविश्वास इतका की म्हणे त्या वाझेंशी माझी भेट झाली. गिरणी कामगाराचं पोरगं आम्ही इथे गिरण भागामध्ये आमचं घर, तर एनआयएच्या कोठडीत जाऊन मी सचिन वाझेची भेट घेतली. आणि त्यांना असे म्हटले की, परबांचे नाव लिहा, आणि त्यांना असे म्हटले की, पवारांचे नाव लिहा. असे मी म्हटले का? हे हास्यास्पद आहे.” अशी खरमरीत टीका त्यांनी मविआ सरकारवर केला.

- Advertisement -

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आठवीत असणाऱ्या विद्यार्थाला सध्या परीक्षा नाहीयत, त्यामुळे त्याला वेळ आहे. अशा आठवीला असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की, पवार साहेबांनी सुद्धा अनिल परब हे गृह खात्यामध्ये लुडबुड करतात याबद्दल नापसंती व्यक्त केली. पवार साहेबांची आणि माझी काही भेट झालेली नाही. पण तुम्ही माध्यामातून छापले की, पवारांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी पवारांना तक्रार केली. मग अनिल परबांची गृहखात्यामधील लुडबुड ती पुन्हा एकदा सभागृहात दिसली. कारण सभागृहात अनिल देशमुख उपस्थित होते, तरी सुद्धा वाझेचे सस्पेंन्शन नाही, लॉंग लिव्हपण नाही, त्याचा चार्ज काढून घेण्याची गोष्ट अनिल परबांनी केली. परमबीर सिंहांचे पत्र आहे, ज्या पत्रामध्ये दर महिन्याला १०० कोटी वसुल करण्याचे विषय आहे. या सगळ्या विषयांमध्ये अनिल देशमुख जसे आहे तसे आणखीन कोणीतरी असतीलच. मग ते कोण असतील? असा अंदाज व्यक्त करायला आठवीचा विद्यार्थीसुद्धा पुरेसा आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील कशाला लागतात. आता वाझे तुमच्यासाठी वाईट झालेत, वाझेंकडून तुम्ही काय काय कारनामे करुन घेतलीत याची भलीमोठी यादी आहे. तुम्हाला बाकीचे विषय मांडायचे आहेत, अर्नब गोस्वामीपासून ते कंगना रानौवतापासून ते डेलकर बिलकर सगळे विषय परमबीर सिंह आणि वाझेंकडून करुन घेतले. आता वाझेपण वाईट आणि परमबीर सिंहही वाईट. त्यामुळे काल परब साहेबांनी आणि आज माझे परम…परम… परम.. मित्र हसन मुश्रीफ, ज्य़ांना दिवसातून एकदा माझ्यासोबत बोल्ल्याशिवाय झोप लागत नाही, त्यांनी आयबीएनला म्हटले की, चंद्रकांत पाटलांना आठ दिवस आधी कसे कळले ? जसे काय वाझे आणि मी रोज भेटतोच आहोत. भेटायला जाईन तर तुम्हालाही घेऊन जातो. भेटायलाच घेऊन जातो बाकी कशाला घेऊन जात नाही. तर असे खुळ्यासारखे, लहान मुलांसारखे प्रश्न यांच्या मनात निर्माण होतात की चंद्रकांत पाटलांना आधी कसे कळले. असाही आरोप पाटील यांनी केला.

परबांच्या राजीनाम्या विषयाचा मुद्सदा पून्हा एकदा वाट पाहून कोर्टात जाईल आणि कोर्ट आदेश देईल, त्यानंतर आणखी दोन राजीनामे होतील असा दावा केला. मला नाव विचारु नका, झाल्यानंतर मला म्हणा, तुचा अंदाज बरोबर होता. हा अंदाज आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले दोन बॅटमन्स जे आहेत ते आऊट व्हायला वेळ लागतो. कारण त्या बॉलर्सलाही जरा सेटिंग बघावे लागते. पण दोन गेल्यानंतर पुढचे आपोआप जातात, रांगेने जातात. त्यामुळे हा परब साहेबांचा जो आरोप आहे त्यांचा जो त्रागा आहे, त्रागा…शिवसैनिक…बाळासाहेब ठाकरे…सॉरी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकेर… शपथ मुलींची… कशासाठी? जा ना चौकशीला समोरे जा ना. तुम्हीच म्हणता ना चौकशीला मी समोरे जाणार आहे. एखाद्या वेळेस न्यायालय असाही निर्णय देईल की. परमबीर सिंहांनी जे आरोप केले आहेत त्यांच्यातील अनिल देशमुखांची चौकशी सीबीआय करणार आणि त्यामध्ये परब जोडा असे होईलही. आणि त्यात काय चुकीचे आहे. असेही पाटील म्हणाले.

- Advertisement -

देशमुखांनी राजीनामा दिला कारण निपक्ष:पातीपणे चौकशी व्हावी. मग ती चौकशी होऊ नये यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात का गेलात? लबाड…म्हणाय़चे एक आणि करायचे एक. अनिल देशमुखांनी राजीनामा का दिला तर सीबीआय चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून…मग सुप्रीम कोर्टात कशाला गेलात? चौकशी होऊ नये म्हणून गेलेले आहेत… काय चालला काय तमाशा? सर्वसामान्य माणूस या सर्वाला विटलायं. कधी राठोडांचा राजीनामा… मुंडेंचा घेतला नाही कारण त्यांचे भाग्य चांगले.. कुठे तरी नवस केलेला दिसतोय…परंतु तो विषय पवार साहेबांच्या डोक्यातून गेलाय असे माझे मत नाही कारण ते या मताचे आहेत की राजकारणात दोन घ्यावे दोन घ्यावे परंतु स्वच्छच राहिला हवे. राठोडांचा राजीनामा झाला… मुंडेंचा वाचला…देशमुखांचा झाला… आता परबांचे नाव आले…यातून सर्वसामान्य माणसाला विट आला आहे. यावर भाजपाची मागणी आहे की, सीबीआय चौकशी होईल, मंत्रीपदाची राजीनामा होईल, गुन्हा दाखल होईल त्यातून अटक होईल. परंतु मंत्री पदाचा राजीनामा त्य़ांना पुरणार नाही कारण ही संघटीत गुन्हेगारी आहे. त्यामुळे मोक्का लावावा लागणार आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी मी करत नाही. अशी मागणी पाटील यांनी केली.

कोरोना विषयी बोलताना पाटील म्हणाले, काल केंद्रीय आरोग्य पथकाने राज्य सरकाराला ठोकठोक ठोकले की महाराष्ट्रात कोरोनाविषय चुकीच्या पद्धतीने हाताळताेय. इंजेक्शनचा पत्ता नाही. त्यासाठी तुमच्या काही उपाययोजना नाहीत. वॅक्सीनेशनमध्ये तुमचा गोंधळ सुरु आहे. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य द्या ना चालवायला. राज्य तुम्ही चालवणार, हप्ते तुम्ही वसुल करणार, भ्रष्टाचार तुम्ही करणार आणि दोष देणार केंद्राला मग केंद्राकडे राज्य चालवायला द्या. अशी टीका पाटील यांनी केली.


 

- Advertisement -