घरताज्या घडामोडीअजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे, चंद्रकांत पाटलांचा टोला

अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे, चंद्रकांत पाटलांचा टोला

Subscribe

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि राजकारणात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यांनी केलेल्या वक्तव्या मागचा नेमका अर्थ काय होता? हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘या राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे आहेत, हेच समजत नाही.’

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? 

भाजपातील महत्त्वाचे नेते संपर्कात असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विधानांवर बोलत असताना चंद्रकात पाटील म्हणाले की, ‘सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २० ते २२ महिने झाले असंच चालंय. एकाही आमदाराला ते आमच्या हात लावू शकले नाहीत. कितीही माणसं पळवायचा प्रयत्न केला तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी चिंचवडचे, हेच समजत नाही. ते संपूर्ण कोरोनाच्या काळात ते कुठे गेले, नागपूरला गेले, चंद्रपूरला गेले, गडचिरोलीला गेले, भंडाराला गेले? हे जिल्हे कुठे आहेत, हे त्यांना माहितच नाहीत आणि म्हणतात, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार. असं म्हणून त्यांनी स्वतःला लहान केलं.’

- Advertisement -

तसेच चंद्रकांत पाटील यांनी पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याला विरोध करण्यारूनही अजित पवारांवर निशाणा साधला ते म्हणाले की, ‘अजित पवारांचा खरा चेहरा आता उघड पडला. वारंवार आम्ही असं म्हणत होतो, राज्याने त्यांचा जीएसटी कर कमी करावा. यामुळे पेट्रोल-डिझेलचे कर कमी होणार आहेत, जे गोव्यात आणि गुजरातमध्ये आहे. आता अजित पवार यांचा चेहरा उघडा झाला की, त्यांना पेट्रोल-डिझेलच्या करावर नगदी मिळवलेल्या पैशावर राज्य चालवायचं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षात आणण्यास त्यांनी विरोध केला. पेट्रोल-डिझेलचे जीएसटी कक्षात आणल्यानंतर थेट ३० रुपयांनी पेट्रोल-डिझेल कमी होणार होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी अजित पवार प्रश्न विचारावा की, तुम्ही लखनऊला का नाही गेलात? तुम्ही का विरोध करता? तुम्हाला आयता पैसा पाहिजे.’


हेही वाचा – ‘माजी मंत्री म्हणू नका’ या वक्तव्याचं चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले….

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -