घरताज्या घडामोडीआपल्या पालकमंत्री काळातील अनुभव पाहणे जरुरीचे; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

आपल्या पालकमंत्री काळातील अनुभव पाहणे जरुरीचे; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

Subscribe

अजित पवार यांना लोकांना हसू येईस असे बोलण्याची सवय आहे. काही बोलले की हशा आणि टाळ्या वाजवणारे लोक असतात. स्वतःच्या पालकमंत्री कालवधीमधील अनुभव पाहणे जरुरीचे आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली.

अजित पवार यांना लोकांना हसू येईस असे बोलण्याची सवय आहे. काही बोलले की हशा आणि टाळ्या वाजवणारे लोक असतात. स्वतःच्या पालकमंत्री कालवधीमधील अनुभव पाहणे जरुरीचे आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी टीका केली. (Bjp Leader Chandrakant Patil Criticizes NCP Leader Ajit Pawar)

“अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम ठरत असून, त्यामध्ये भांडण होतात. हा गट म्हणतो मी निधी आणला, तो गट म्हणतो मी निधी आणला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यानी जाण्याची अपेक्षा नाही”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, कोणताही कार्यक्रम ठरल्यानंतर व्यत्यय येऊ नये, त्यामुळे अशी परवानगी घेण्यात चुकीच काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“आमच्या घरातील पैसे खर्च करून अनेक सामाजिक काम करत आहे. त्यामुळे सार्वजनिक निधी हा सार्वजनिकच आहे. तसेच काही ठिकाणी उद्घाटनावरून भांडण होत असून, आदल्या दिवशीच उद्घाटन होत आहे. त्यामुळे ‘अधिकृत कार्यक्रम नसेल तर तुम्ही जाऊ नका’, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, काही वादग्रस्त झाल्याशिवाय, दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय, चिमटा काढल्याशिवाय मोठे विषय संपतच नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे की,१९९५ निवडणुकीत भाजप-सेना युतीच सरकार आले. तेव्हा राजकीय पार्श्वभूमी नसताना, तो मंत्री होतो. आरएसएस, भाजपाने आजपर्यंत सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांला ताकद देण्याच काम केले आहे. या गोष्टी यांना पेलवतच नसून मंत्री म्हटल्यावर त्यांचे दोन कारखाने पाहिजे. पण माझा एक ही कारखाना नाही. चार सूतगिरण्या, दोन बॅंका, जमीन, कारखान्याला ऊस जायला पाहिजे. आमच तस काही नसल्याने त्यांना पेलवत नाही. त्यामुळे मलासारखा चिमटा काढण्याचा प्रयत्न करीत असतात”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

“दहा बारा जणांनी एकत्रित बसून, महाराष्ट्र राजकारणवर आचारसंहिता लिहिली पाहिजे. अजित पवार यांना पण ती आचारसंहिता आपोआपच लागू पडेल. तुम्हाला उठसूठ लोकांना टपली मारण्याचा अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते. तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. आम्ही कोणाची काळजी करित नाही आणि घाबरत देखील नाही. तुम्ही कोणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसला होता. त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना, आपण काचेच्या घरात बसलो आहे. हे लक्षात ठेवल पाहिजे. त्यामुळे एक आचारसंहिता झाली पाहिजे. प्रत्येकाने एकमेकांना आदर दिला पाहिजे”, असेही पाटील म्हणाले.


हेही वाचा – आमची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील भीतीच्या वातावरणाविरोधात; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -