Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'त्यांच्या रक्तात शिवराळ भाषा', राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

‘त्यांच्या रक्तात शिवराळ भाषा’, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Subscribe

दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्याप्रकरणी फडणवीस यांना पुराव्यासहित 10 पत्र पाठवले आहेत. भेटीची वेळ मागितली आहे. या राज्यात सहकार खात्यात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याचे मला काही पुरावे द्यायचे आहेत. पण त्यांना वेळ नाहीये. कोणत्या नशेत हे सरकार फिकतय? मला माहित नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला

दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्याप्रकरणी फडणवीस यांना पुराव्यासहित 10 पत्र पाठवले आहेत. भेटीची वेळ मागितली आहे. या राज्यात सहकार खात्यात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याचे मला काही पुरावे द्यायचे आहेत. पण त्यांना वेळ नाहीये. कोणत्या नशेत हे सरकार फिकतय? मला माहित नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राऊतांच्या या वक्तव्याला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘राऊतांच्या रक्तात शिवराळ भाषा आहे. जेलमध्ये राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे शब्द, अपशब्द बोलत आहेत’, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले. (Bjp Leader Chandrakant Patil Criticizes Thackeray Group Mp Sanjay Raut)

नेमकं काय म्हणाले बावनकुळे?

- Advertisement -

भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊत यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतीलच. राऊतांच्या रक्तात शिवराळ भाषा आहे. जेलमध्ये राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे शब्द, अपशब्द बोलत आहेत. त्यांच्या प्रत्येक विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही प्रवक्ते नेमलेले आहेत. तेच राऊतांना उत्तर देतील”, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“खालच्या भाषेत बोलणे आणि आपले संस्कार संस्कृती विसरणे हा नीचपणा त्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्या रोजच्या नीचपणाला, रोजच्या वेडेपणाला आम्ही उत्तर द्यावे हे आम्हाला अपेक्षित नाही. परंतु, अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडतं आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. आम्ही वारंवार सांगितलं आहे की, त्यांच्या पक्षप्रमुखाने यांच्या तोंडावर पट्टी बांधा. ज्याप्रकारे ते अश्लील बोलतात त्यामुळे त्यांचे तोंड बंद करा”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

“संजय राऊत यांनी आम्ही सोडून दिलेले आहे. ते जेलमधून आल्यापासून वेगळच काहीतरी शिकून आले. आम्ही उद्धव ठाकरेंना बोललो. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमदारांचा निवडून आणले. त्यांनी मोदी आणि शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा – दंगल होणार आहे का? भीमा-पाटस कारखाना भेटीवरून राऊंताचा सवाल

- Advertisment -