घरमहाराष्ट्रनाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत; नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु - चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत; नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु – चंद्रकांत पाटील

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधिय् जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे नाथाभाऊ लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं नक्की झालं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी तेपत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून आमचे मार्गदर्शक आहेत. सर्वांचा हिरमोड होईल, पक्षाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु असून पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला.

- Advertisement -

खडसेंच्या पक्षांतरावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता उत्तर द्यायचं टाळलं. असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. त्यावर मी बोलणार नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचे टाळले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -