Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाग्युद्ध रंगलं आहे. आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी उत्तर दिलं. संजय राऊत यांच्या उत्तराला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज वाढदिवशी शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी टोमणा मारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे,” असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी खंत देखील बोलून दाखवली. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची – संजय राऊत

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं उत्तर राऊत यांनी दिलं. यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

- Advertisement -

- Advertisement -