जसे जसे 2024 जवळ येईल, तसे भविष्यात बॉम्बस्फोट दिसतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मविआ’ला इशारा

'मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील जसे जसे 2024 जवळ येईल', असा सूचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Chandrashekhar Bawankule

‘मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील जसे जसे 2024 जवळ येईल’, असा सूचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. याशिवाय, बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. (bjp leader chandrasekhar bawankule slams ncp congress shivsena and mva government)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचं भलं झाले. जे 50 प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झाले. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये, उद्धवजींकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

“उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाही. त्यामुळे कोणत्या समित्या नाही, काम नाहीत. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं असा आक्षेप हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रचंड नाराज आहे. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाहीत. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटले असा आक्षेप हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी आहे”, असेही त्यांनी म्हटले.


हेही वाचा – मोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा