घरताज्या घडामोडीविदर्भातील भाजप नेते छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर, काँग्रेसमध्ये मोठी संधी मिळणार?

विदर्भातील भाजप नेते छोटू भोयर काँग्रेसच्या वाटेवर, काँग्रेसमध्ये मोठी संधी मिळणार?

Subscribe

विदर्भात भाजपला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान छोटू भोयर आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रमुख नेते यांच्यात बंद दाराच्या आड चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. छोटू भोयर हे भाजपमधील वजनदार नाव असून विदर्भात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. परंतु भाजपकडून तिकीट मिळत नसल्यामुळे छोटू भोयर हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेते छोटू भोयर हे भाजपमध्ये सध्या नाराज असल्याचे समजते आहे. आगामी विधानपरिषदेची उमेदवारी छोटू भोयर यांना हवी आहे. तिकीट देण्यासाठी भोयर यांनी भाजपमध्ये मागणी केली असल्याचेही समजते आहे. तसेच सोमवारी रात्री भाजप नेते छोटू भोयर यांची काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत काँग्रेसमध्ये प्रवेशाची आणि विधानपरिषदेसाठी उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये भोयर यांना विधानपरिषदेसाठी तिकीट देण्याबाबत विचार सुरु आहे. तसेच विधानपरिषदेसाठी तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. भोयर यांना तिकीट दिल्यास विदर्भात काँग्रेस अधिक बळकट होईल. कारण छोटू भोयर हे भाजपच्या दृष्टीने नागपुरात फार महत्त्वाचे नेते आहेत. मात्र भोयर यांनी विधानपरिषदेसाठी तिकीटाची मागणी केली होती. परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री देखील भाजपकडे तिकीट मागण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. छोटू भोयर हे आपल्या मागणीवर ठाम असून माघार घेण्यास तयार नसल्यामुळे काँग्रेससोबत चर्चा करत आहेत.

कोण आहेत छोटू भोयर?

भाजपचे ज्येष्ठ नेते छोटू भोयर नगरसेवक, उपमहापौर, एनआयटी ट्रस्टी राहिले आहेत. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. तसेच विदर्भातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. आरएसएसचे नेते डॉक्टर विलास डांगरे यांचे छोटू भोयर हे नातेवाईक आहेत.

- Advertisement -

गोंदीयात राष्ट्रवीदाला झटका?

गोंदीयामधील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा महादेवराव शिवणकर यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचे पुत्र विजय शिवणकर यांनी जिल्हा परिषद माजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून विजय शिवणकर ओळखले जातात. जिल्हा परिषदेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीला फार मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत नाराज असल्यामुळ राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आता शिवणकर पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.


हेही वाचा : Amravati Violence: अमरावतीचा दौरा रद्द करा, किरीट सोमय्यांना अमरावती पोलिसांची नोटीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -