घरताज्या घडामोडी'तुमचे दात जास्तच दिसतायत, ते घशात जातील'; महिला नेत्यांमध्ये जुंपली

‘तुमचे दात जास्तच दिसतायत, ते घशात जातील’; महिला नेत्यांमध्ये जुंपली

Subscribe

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आजी – माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक उडाली आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीचे ट्विट करत चाकणकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षातील विकृती भाजपचे संस्कार दाखवत असल्याबाबत छेडले होते. तसेच आता यांनाही क्लिन चीट देणार का? असाही प्रश्न विचारला होता. तसेच चित्रा वाघ यांना टॅग करत “आपण शांत का? खायचे दात एक अन दाखवायचे दात एक… ” असा प्रश्नही विचारला होता.

- Advertisement -

 

- Advertisement -

रुपाली चाकणकर यांच्या ट्विटनंतर चित्रा वाघ यांनी देखील ट्विटरवर प्रतिहल्ला केला. खायचे दात आणि दाखवायचे दात काढणाऱ्या चाकणकर यांना आपले दात सांभाळून ठेवण्याचा सल्ला वाघ यांनी दिला आहे. “ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही भाजप चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही”, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

हिंगणघाटच्या घटनेनंतर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना बावळट म्हटले, तर चाकणकर यांनी चित्रा वाघ यांचा पायगुण वाईट असल्याचे आपल्या फेकबुक पोस्टमध्ये लिहिले होते.

 


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -