Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब, चित्रा वाघ यांनी राऊतांना डिवचलं

हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब, चित्रा वाघ यांनी राऊतांना डिवचलं

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली होती. त्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपने या मुद्यावरून काँग्रेसला घेरले आहे. मात्र, त्या वादात ठाकरे गटानेही उडी घेतल्यानंतर भाजप नेत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भगवान शंकरांच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शंकराचा अवतार मानतात, मग सापाचा एवढा तिटकारा का?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेत्या आणि भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी संजय राऊत हे पंतप्रधानजी यांच्यावर टीका करू लागलेत. राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्यांची निष्ठा आता काँग्रेसच्या चरणी वाहतेय. सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या चपलाही उचलायला लागलेत, यात आश्चर्य ते काय?, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखात काय?

- Advertisement -

शंकराने विष पचवले म्हणून तो निलकंठ झाला. कोही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णू आणि शंकराचे अवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकारशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे, असं म्हटलं आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळलं जात असल्याची टीका सामानातून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृत्त्वात भाजपने विषाचा महायज्ञ मांडला आहे. भाजपचे लोक देशद्रोही फुत्कार सोडत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.


हेही वाचा : …यालाच दंश करणं म्हणतात, भाजपचा राऊतांवर


 

- Advertisment -