Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'अमित शाहांनी तुम्हाला चिखलात लोळवलंय अन्...', चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘अमित शाहांनी तुम्हाला चिखलात लोळवलंय अन्…’, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

'अमित शाहांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय', अशा शब्दांत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता.

‘अमित शाहांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय’, अशा शब्दांत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. (bjp leader Chitra Wagh criticized to Uddhav Thackeray amit shah)

मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूलन (बीकेसी) येथील मैदानात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाषण केले. उपस्थित जनतेला संबोधित करताना सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषण्याच्या शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले. “अमित शाह यांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानालाच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे, तुम्ही जमीन दाखवण्याच्या वल्गना करू नका. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- Advertisement -

“नुसती वज्रमुठ करून उपयोग नाही. या वज्रमुठीत आपल्याला भगवा धरायचा आहे. या भगव्याला डाग आणि कलंग लावण्याचा यांनी प्रयत्न यांनी केला आहे. तो त्यांच्याबरोबरच साफ करून हा छत्रपती शिवरायांचा भगवा उंच तेजाने फडकवत ठेवायचा आहे”,

“ही तर आता सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी आता एकच वज्रमुठ आणि त्या मुठीत एकच ठोसा असा मारा की, महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या किंवा मग लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या तुम्हाला आम्ही भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”,

“अमित शाह यांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले.


हेही वाचा – ‘मविआची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisment -