Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. तसेच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका मांडली होती. अखेर आज संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. संजय राठोड आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी राजीनामा देण्यासाठी गेले होते. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी सरकारकडून अधिकृतपणे त्याची घोषणा झाली नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत याप्रकरणावरील भूमिका काय आहे? हे दिसत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावरील भूमिका स्पष्ट करावी.’

‘बलात्काऱ्यांना आणि हत्या करणाऱ्यांना त्या जागी बसण्याचा अधिकार नाही’

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘काल आम्ही मुख्यमंत्र्यांना जे आवाहन केलं होतं. त्याचा ते नक्कीच विचार करतील. येणाऱ्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा मंजूर करतील. जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा मंजूर करतील तेव्हा आम्ही पहिलं पाऊल उचलेलं असेल. यामध्ये फक्त प्रश्न संजय राठो़ड आणि पूजा चव्हाणचा नाही. कारण महाराष्ट्राने कायम दिशा देण्याच काम केलं आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अशा बलात्काऱ्यांना आणि हत्या करणाऱ्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही आहे.’

‘याप्रकरणात पोलिसांची संग्दिध भूमिका’

- Advertisement -

‘याप्रकरणी अजून एफआयआर झाला नाही आहे. आज १८ दिवस झाले असून लागोपाठ आम्ही सतत बोलतोय, विविध प्रश्न आम्ही प्रसिद्ध माध्यमांच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून पोलीस विभागाला करतोय आणि तरीसुद्धा त्याच्यावर काही कारवाई होत नसेल. त्याच्यावरती कोण जर काही बोलणारच नसेल. तर निश्चितपणे पहिल्या दिवसांपासून याप्रकरणात ज्या ज्या पोलिसांची संग्दिध भूमिका आहे. त्या पोलिसांना त्यांच्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही आहे,’ अशा चित्रा वाघ म्हणाल्या.


हेही वाचा – राजीनामा नको, राठोड यांना अटक करा; भाजप नेते राठोडांच्या राजीनाम्यावर आक्रमक


- Advertisement -

 

- Advertisement -