घरताज्या घडामोडीचित्रा वाघ फोटो मॉर्फ प्रकरणी एकाला अटक

चित्रा वाघ फोटो मॉर्फ प्रकरणी एकाला अटक

Subscribe

चित्रा वाघ फोटो मॉर्फ प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत होत्या. त्यांनी पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याच दरम्यान, चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच त्यांना धमकीचे फोन देखील केले जायचे. याचप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील दोन जणांविरुद्ध मुंबई क्राईम ब्रान्चने गुन्हा दाखल केला आहे. तर एका आरोपीला अटक करण्यात आली असून राहुल तुळशीराम आडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार झाला आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, ‘दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्कार्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का??? FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही’, असे म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले होते. तसेच धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही, असे म्हणत त्यांनी इशाराही दिला होता.

- Advertisement -

त्यानुसार पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील दोन जणांविरुद्ध मुंबई क्राईम ब्रान्चने गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर संतोष राठोड हा आरोपी फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – Maharashtra Budget 2021 : पेट्रोल, डिझेल, LPG दरामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार?

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -