घर महाराष्ट्र भाजप सोडणार नाही, खडसेंचा खुलासा

भाजप सोडणार नाही, खडसेंचा खुलासा

Subscribe

काही दिवसांपूर्वी भुसावळ येथील लेवा पाटील समाजाच्या एका कार्यक्रमात खडसे गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी कोणावरही एका पक्षाचा शिक्का कायमचा असत नाही, असे म्हटले होते. यामुळे खडसे भाजप सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. यावर खडसे यांनी खुलासा केला आहे.

बऱ्याच दिवसांपासून राजकीय वर्तुळात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. कुठल्याही नेत्यावर एकाच पक्षाचा शिक्का असू शकत नाही, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, ते भाजप सोडणार सोडणार नाहीत, असा खुलासा खुद्द खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे देखील ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकूण आल्यानंतर भाजपकडून खडसेंवर गृहमंत्री पदाची धूरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, समाजसेविका अंजली दमानिया यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर या कालावधीत खडसेंवर विरोधी पक्ष आणि इतर लोकांकडून बरोच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे भाजप पक्षाने त्यांच्याजवळील मंत्रीपद काढून घेतले. पुण्याच्या जमिन भूसंपादन प्रकरणी खडसे यांना क्लीन चीट मिळाली होती. परंतु, क्लीन चीट मिळून देखील त्यांना पक्षाकडून मंत्रीपद दिले गेले नाही. यामुळे खडसे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. त्यामुळे खडसे भाजप पक्ष सोडतील, अशी शंका वर्तवली जात होती. यावर खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचे खडसे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी भुसावळ येथील लेवा पाटील समाजाच्या एका कार्यक्रमात खडसे गेले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते देखील आले होते. त्यांनी खडसेंजवळ पक्षात येण्याविषयी भाष्य केले होते. त्यामुळे खडसे त्याच गोष्टीचा धागा पकडत कोणावरही एका पक्षाचा शिक्का कायमचा असत नाही, असे म्हणाले होते. ते तेथील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना उद्देशून म्हटले होते, असे त्यांनी सांगितले. पण त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे खडसे यांनी स्पष्ट केले.


- Advertisement -

हेही वाचा – विरोधक म्हणतात, ‘एकनाथ खडसे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -