Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे- गिरीश महाजनांचा...

एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे- गिरीश महाजनांचा टोला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला आहे. यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहीजे असे उपहासात्मक विधान करत भाजप नेते गिरिश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे. (BJP leader Girish Mahajan slams NCP leader Eknath Khadse)

रविवारी सकाळी मिडियाशी कोरोनावर बोलताना महाजनांनी खडसेंवर निशाणा साधला. संपूर्ण राज्यात कोरोना आहे. पण जळगाव जिल्ह्यात मात्र वेगळ्याच प्रकारचा विषाणू आढळला आहे. एका व्यक्तीला त्याची तीन वेळा लागण होत आहे. एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे. याची चौकशी करावी असे मी म्हणत नाही पण त्यावर शास्त्रज्ञांनी मात्र संशोधन करायला हवे. त्याचा नायनाट करायला हवा .तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या असे आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितल्याचे महाजन यांनी मिडिय़ाशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले खडसे सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी खडसे सोडत नाहीत. यामुळे भाजपच्या गोटात खडसेंबदद्ल रोष आहे . याचापार्श्वभूमीवर महाजनांनी कोरोनावरून खडसे यांना लक्ष्य केलं असून यावर खडसे काय प्रतिक्रीया देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

 

- Advertisement -