घरमहाराष्ट्रभाजप नेते किरीट सोमय्यांना पण हवी खारघर दुर्घटनेची चौकशी

भाजप नेते किरीट सोमय्यांना पण हवी खारघर दुर्घटनेची चौकशी

Subscribe

श्री सदस्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता स्वतः भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही मागणी केली.

खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठीचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहिले होते. तर लाखोंच्या संख्येने श्री सदस्य सुद्धा या सोहळ्यात उपस्थित राहिले होते. पण उष्माघातामुळे या सोहळ्यामध्ये एकूण १४ श्री सदस्यांना आपला जीव गमवावा लागला. या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. या सोहळ्यात झालेल्या श्री सदस्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता स्वतः भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही मागणी केली.

यावेळी खारघर दुर्घटना घडल्यानंतर भाजपाचा एकही नेता मृतांच्या कुटुंबियांना भेटायला का गेला नाही? असे प्रसार माध्यमांनी विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले की, “मी स्वत: खारघरला गेलो होतो. पण तुम्ही म्हणता किरीट सोमय्या खारघरला गेले नाहीत. मी स्वत: खारघरला गेलो होतो. ही दुर्दैवी घटना आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी अधिकारी नेमला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – सत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स, पुलवामा हल्ल्याबाबत केला होता गौप्यस्फोट

“याची चौकशी कशी झाली पाहिजे? याची मागणी करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. तशी मागणी ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे करत आहेत. यावर कॅबिनेट योग्य निर्णय घेईल. पण ही घटना दुर्दैवी आहे. याचं आम्हाला दु:ख आहे. यापुढे असं काही होऊ नये, याची काळजी आम्हालाही घ्यावी लागेल,” असे मतही यावेळी किरीट सोमय्या यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, आज मुंबईतील घाटकोपर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शिबीर पार पडले. या शिबीरामध्ये देखील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, असा सूर लावलेला पाहायला मिळाला. “राज्यात आणि देशात चिंताजनक परिस्थिती आहे. अनेक गोष्टी देशात आणि राज्यात घडत आहेत. त्यावर पडदा टाकण्याचं काम केलं जातंय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्य सरकारचा होता. त्यामुळे या सोहळ्यातील दुर्घटनेची जबाबदारी १०० टक्के राज्य सरकारचीच आहे. खारघरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरकारने आवश्यक खबरदारी घेतली नाही. सरकारच्या निष्काळजीपणामुळेच श्री सदस्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यासाठी ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केलीय ते प्रामाणिक आहेत. पण शेवटी ते सरकारी अधिकारी आहेत. पण कितीही प्रामाणिक असले तरी सरकारी अधिकारी त्याच्या बॉसची कशी चौकशी करणार?” असा सवाल देखील यावेळी शरद पवारांनी उपस्थित केलाय. त्यामुळे खारघर दुर्घटनेची चौकशी सरकारी अधिकाऱ्यांऐवजी हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीशांनीच करावी, अशी मागणीच यावेळी शरद पवारांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -