अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

bjp leader Kirit Somaiya leaves for Dapoli anil parab resort
अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या इराद्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या आता दापोलीकडे रवाना झाले आहेत. ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ असा नारा देत किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. सोमय्यांनी हाती प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले असून खेडे ते दापोलीला १०० गाड्यांचा ताफा निघणार आहे. काल, शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी सोमय्यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागमधील कोर्लईमध्ये झालेला शिवसेना-भाजप संघर्ष दापोलीत पाहायला मिळणार आहे. दरम्यान दापोलीकडे रवाना होण्यापूर्वी किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, ‘ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे समोर आणणार. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा.’

‘अनिल परबांना मंत्रिमंडळातून काढावं लागणार’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारमध्ये जे घोटाळेबाज, अनधिकृत बांधकाम, वसूलीचा पैसा, ५ स्टार रिसॉर्ट, ५ स्टार बंगले बांधण्याचे काम करतायत, त्याच्यावर करावाई करण्याचा हा प्रतिकात्मक हातोडा आहे. या घोटाळेबाज सरकारचा जनता असाच हातोडा घेऊन सत्यानाश, विनाश करणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा आहे. जनतेची ताकद, शक्ती ठाकरे सरकारला दाखवायला चाललो आहे. महात्मा गांधींही मीठ सत्याग्रह करायला केला होता. तर हा सुद्धा एक सत्याग्रह आहे. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटींच्या सत्यासाठीचा सत्याग्रह आहे. या अनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावाच लागणार आहे,’ असे किरीट सोमय्या म्हणाले.

‘याची उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे’

पुढे सोमय्या म्हणाले की, ‘अनिल परब यांच्या रिसॉर्टचं बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांने अनधिकृत घोषित केले होते. राज्य सरकारने ते तोडण्याचा आदेशही दिले होते. राज्य सरकारने त्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली. अनिल परब यांना स्वतःला तोडण्याचा आदेश देण्यात आले होते. ते तोडल्यानंतर आता अनिल परब यांनी बेकायदेशीर बांधकाम केले, त्याच्यावर फौजदारी कारवाई झालीये. तिथे दोन रिसॉर्ट असून ते दोन्ही अनिल परब यांचे आहेत. एकावर पोलिसांनी एफआयआर नोंदवली. पण ते दुसऱ्याच्या नावाने नोंदवली. उद्धव ठाकरेंची ही चाल आम्हाला कळणार नाही का? अनिल परबांच्या दोन बिल्डिंग आहेत. मी आतापर्यंत अर्धा डझनवेळा जाऊ आलो. एकावर फौजदारी कारवाई झाली, तर दुसऱ्यावर का नाही? कारण अनिल परब आणि उद्धव ठाकरे पोलिसांना नाचवतात. ही उद्धव ठाकरेंची पोलीस नाही, महाराष्ट्राच्या जनतेची पोलीस आहे. पोलिसांना अनिल परबयांच्याविरोधात एफआयआर, फौजदारी कारवाई करावीच लागणार. त्यासाठी जात आहोत. आता भारत सरकारला दापोली कोर्टात येऊन तक्रार करावी लागते. याची उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे.’


हेही वाचा – मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला