घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Subscribe

अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने काल, मंगळवारी मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. तसेच काही प्रश्नही विचारले आहेत. सोमय्या म्हणाले की, ‘श्रीधर पाटणकराचे कारनामे यासंबंधित गेले दीड वर्ष मी ईडीसोबत पाठपुरावा करत आहे. काल जो एक व्यवहार ईडीने जनतेसमोर आणला, तो एकदंरी ३० कोटींचा गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग झाले आहे. गेल्या दीड वर्षात मी ईडीला वेगवेगळी माहिती दिली आहे. या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप पण उडणार आहे. कालच्या प्रकरणात आपण एक पाऊल पुढे जर गेलो, तर यात नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे सोमय्या म्हणाले की, ‘११ नोव्हेंबर २०२०ला असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय? त्यावेळी मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार आहेत, असे सांगितले होते. आज माझा प्रश्न आहे की, उद्धव ठाकरे आणि हवाला ऑपरेटर, हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीची संबंध काय? जर उद्धव ठाकरेंनी चतुर्वेदीसोबतचे कुटुंबियांचे संबंध, त्यांचे आर्थिक व्यवहार, व्यावसायिक संबंध स्वतः सांगितली. तर किरीट सोमय्या असो, ईडी असो, आयटी असो किंवा न्यायालय असो त्यांना जास्त मेहनत करावी लागणार नाही.’

- Advertisement -

सोमय्यांच्या प्रश्नांची सरबत्ती

आजच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत सोमय्या ठाकरे कुटुंबियाविरोधात आरोपांची राळ उठवली. सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून विचारले की, ‘मनी लाँड्रिंगचे ठाकरे कुटुंबियांचे हे पहिलेच प्रकरण आहे का? या आधी मनी लाँड्रिंग केली आहे का? श्रीधर पाटणकरने मनी लाँड्रिंग करून ठाकरे कुटुंबियांच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवलेत का? याबाबत मुख्यमंत्री बोलणार की मी तोंड उघडू?’

लवकरच शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे सोमय्या बाहेर काढणार

‘उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवण्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण शेवटी खरे बाहेर आले. २०१९मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात, १९ बंगले माझे आहेत आणि २०२१ मध्ये तिथे बंगलेच नाहीत आणि बंगलेच नव्हते. हा अशाच पद्धतीचा किस्सा आहे. श्रीधर पाटणकर, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक व्यवहार आणि पार्टनरशिप याबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का? गेल्या काही वर्षांपासून आपले जे आर्थिक व्यवहार आहेत, ज्या ज्या कंपन्यातून आपण पैसे घेतले आहेत, मनी लाँड्रिंग केले आहे, याची माहिती उद्धव ठाकरे तुम्ही देणार का? येत्या काही दिवसांत मी लवकरच शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असाही दावा किरीट सोमय्यांनी केला.

- Advertisement -

ठाकरे कुटुंबियांनी ही कंपनी दिली नंदकिशोर चतुर्वेदीला

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, ‘आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी २०१४मध्ये जी कोमास प्रॉपर्टीज कंपनी बनवली होती. त्यामध्ये आदित्य ठाकरे डिलर आणि मालकही होते. कंपनीतील ५० टक्के भाग आदित्य ठाकरे आणि ५० टक्के भाग रश्मी ठाकरे यांचा होता. या कंपनीची आता काय अवस्था आहे? ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीची झाली आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे कुटुंबियांनी जी कंपनी बनवली होती, ती नंदकिशोर चतुर्वेदी का दिली?’


हेही वाचा – ईडीच्या फेऱ्यात ठाकरे कुटुंबीय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -