घरताज्या घडामोडीKirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या ९ वाजता कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद, मुश्रीफांचा आणखीन एक घोटाळा करणार उघड

Subscribe

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या संदर्भातच या गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी सोमय्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. मात्र त्यादरम्यान आज पहाटे साडे चार वाजता कराडमधून किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मग पोलिसांच्या विनंतीनंतर किरीट सोमय्या यांनी पुढे कोल्हापूरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोमय्या कराडच्या शासकीय विश्रामगृहात असून आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांचा आणखीन एक घोटाळा उघड करणार आहेत.

- Advertisement -

जेव्हा किरीट सोमय्या मुंबईतून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले तेव्हापासून पोलिसांनी त्यांचा फॉलोअप घेतला होता. त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या त्यांच्यावर कारवाई केली. मग पोलिसांच्या विनंतीनंतर सोमय्या कराडमध्ये थांबवण्यास तयार झाले. दरम्यान कोल्हापूरमध्ये १४४ कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्यानुसार २० सप्टेंबर पहाटे ५ ते २१ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूरातील सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा आदेश दिला आहे. यासंबंधीत नोटीस देखील सोमय्यांना पाठवली आहे.

ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूरचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर जिल्हात तीव्र पडसाद उमटत आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरात येऊ नये, त्यांना कोल्हापुरी भाषेत उत्तर दिले जाईल, खिंडीत गाठून गनिमी काव्याने कोल्हापूर हिसका दाखवला जाईल, कोल्हापुरात आल्यानंतर दुष्परिणाम भोगावे लागतील, अशा अनेक आव्हाननंतर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात चाललेय तरी काय?; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -