आता मराठी माणूस आठवला का? प्रश्न विचारत सोमय्यांचा परबांवर हल्लाबोल

अनिल परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले.

bjp kirit somaiya attack bmc uddhav thackeray and allegation bmc remedisivir 100 crores scam covid center

‘आता तरी त्यांनी मराठी माणून आठवला ही चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा रिसॉर्ट बांधला, त्यामध्ये करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पैसा टाकला. हे कार्यालय अनधिकृत होतं. पण ते आतापर्यंत सांगत होते की माझे काहीच अनधिकृत नाही, मग आता अनधिकृत कार्यालयच तुटलं आहे’, अशा शब्दांत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. (BJP Leader Kirit Somaiya Slams Thackeray Group MLA Anil Parab)

अनिल परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. “आता तरी त्यांनी मराठी माणून आठवला ही चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा रिसॉर्ट बांधला, त्यामध्ये करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पैसा टाकला. हे कार्यालय अनधिकृत होतं. पण ते आतापर्यंत सांगत होते की माझे काहीच अनधिकृत नाही, मग आता अनधिकृत कार्यालयच तुटलं आहे. तसेच, 100 कोटींची सचिन वाझे यांच्याकडून वसून करताना त्यांना मराठी माणूस नाही आठवला. वसूलीसाठी त्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या करताना मराठी माणून नाही आठवला. आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटले, कार्यालय तुटले आहे. त्यामुळे आता कितीही सबब दाखवली तरी काय फायदा होणार नाही”, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले.

“म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून सकाळपासून पोलिसांशी चौकशी सुरू आहे. लोकायुक्ताच्या सुनावणीवेळी निर्णय झाला असून त्याच निर्णयाचे पालन होत आहे. जून 2019 मध्ये अनिल परब यांनी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या कार्यालयाचे तोडकाम पूर्ण झाल असून, उर्वरीत काम म्हाडा पूर्ण करणार आहे. हे कार्यालय ज्यांनी बांधलं आणि त्या कार्यालयामध्ये वीज कुठून येत होतं. त्याला MRTP लागू करा, अशा माझी मागणी होती. अनिल परब यांचे जे कार्यालय तोडण्यात आले, हे कार्यालय वाचवण्यासाठी अनिल परब यांनी प्रचंड खटाटोप केला होता. उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शहरी न्यायालयात गेले होते. याबाबत म्हाडामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे”, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.

“मिलिंद नार्वेकर यानी त्यांचा अनधिकृत बंगल्याचे स्वत:हून तोडकाम केले. त्यानंतर आज अनिल परब यांचे कार्यलय तुटले. मागील पाच ते सहा वर्षांपासून अनिल परब या कार्यालयातून आपले साम्राज्य चालवत होते. ते कार्यालय आता तुटले आहे. आता मी माझा मोर्चा उरलेल्या साई रिसॉर्टकडे आणि अस्लम शेख यांच्या स्टुडीओकडे वळवणार आहे”, असे सोमय्या यांनी सांगितले.


हेही वाचा – किरीट सोमय्यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतलीय; अनिल परबांचा आरोप