घरदेश-विदेशमी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे सरकारमधील असलेल्यांची बेनामी संपत्ती जप्त...

मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे सरकारमधील असलेल्यांची बेनामी संपत्ती जप्त करून जनतेला परत देणार – सोमय्या

Subscribe

मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किरीट सोमय्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावल्याचे दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे आज किरीट सोमय्या मुंबईतील सांताकूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही. ठाकरे सरकारमधील असलेल्यांची बेनामी संपत्ती जप्त करून जनतेला परत देणार.’

माध्यमांना नोटीस दाखवत सोमय्या म्हणाले की, ‘हे पाहा मला नोटीस आली आहे. हजर व्हा. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. कशाबद्दल? ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ते संजय राऊत बाप-बेटाला जेलमध्ये पाठवणार सांगतात. आम्ही दोघेही हजार वेळा जेलमध्ये जाऊ.’

- Advertisement -

पुढे सोमय्या म्हणाले की, ‘छगन भुजबळची १०० कोटींच्या संपत्ती संदर्भात किरीट सोमय्यांनी हायकोर्टात याचिका केली होती आणि त्यामुळे भूजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. ४ सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित होऊन ती जप्त करण्यात आली. त्याच्या पाहणीसाठी मी गेलो होतो. ४ सप्टेंबर २०२१ची ही घटना आणि महाशय उद्धव ठाकरे आज मला जेलमध्ये पाठवतायत. पण अशा प्रकारच्या धमक्यांना मी घाबरत नाही. मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार आहे. तसेच ठाकरे सरकारचे जे जे घोटाळेबाज आणि ज्यांनी बेनामी संपत्ती जमवली असेल. ती जप्त करून जनतेला परत देणार आहे.’


हेही वाचा – किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, अपशब्दांचा केला वापर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -