घरताज्या घडामोडीभाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका - माधव भांडारी

भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका – माधव भांडारी

Subscribe

अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये झालेल्या दंगली राज्यातील महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजप तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजप कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी प्रदेश  भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी येथे केली.

भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यात नुकत्याच झालेल्या धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी. तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा, अशा मागण्या भांडारी यांनी यावेळी केल्या.

- Advertisement -

मालेगाव येथे दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली का याची माहितीही सरकारने जाहीर करावी असे भांडारी यांनी सांगितले. नांदेड येथे अटक केलेला एक दंगलखोर पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. अजूनही पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अमरावती येथे इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या सीईटी आणि अन्य परीक्षांचे फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याबद्दल आरडाओरडा करणारे महाराष्ट्रातील विचारवंत, बुद्धीमंत, पत्रकार अमरावतीतील इंटरनेट सेवा बंद असल्याबाबत मौन पाळून असल्याबद्दल भांडारी यांनी आश्चर्य व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावेत; नाना पटोलेंची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -