घरमहाराष्ट्र'माझा पाठलाग केला गेला'; हो मी मान्य...'त्या' आरोपांवर मोहित कंबोज यांचा...

‘माझा पाठलाग केला गेला’; हो मी मान्य…’त्या’ आरोपांवर मोहित कंबोज यांचा खुलासा

Subscribe

ते एक फॅमिली रेस्टाॅरंट आहे. मी माझ्या पत्नीसहित एका मित्राच्या वाढदिवसासाठी तिथे गेलो होतो. त्यावेळी माझा पाठलाग करत हा चुकीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं कंबोज यांनी स्पष्ट केलं.

मोहित कंबोज यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. याआधी त्यांच्या पत्नीनेही ट्वीट करत उत्तर दिलं होतं. ( BJP leader Mohit Kamboj gave Explanation on Sanjay Raut Tweeted Video )

मोहित कंबोज म्हणाले की, जो व्हिडीओ ट्वीट करत तो बार असल्याचं सांगितलं जात आहे. ते एक फॅमिली रेस्टाॅरन्ट आहे. त्या व्हिडीओमागे वेगळंच सत्य आहे. राऊत यांनी व्हिडीओ ट्वीट करत खोटं पसरवण्याचा प्रयत्न केल्याचंही कंबोज यावेळी म्हणाले. ते एक फॅमिली रेस्टाॅरंट आहे. मी माझ्या पत्नीसहित एका मित्राच्या वाढदिवसासाठी तिथे गेलो होतो. त्यावेळी माझा पाठलाग करत हा चुकीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं कंबोज यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

कंबोज म्हणाले की, रात्रीचे दोन वाजता मी तिथे होतो. माझा पाठलाग केला गेला. काही मुलं त्या हाॅटेल बाहेर उभे होते. त्यानंतर ती मुलं आत आली आणि गोंधळ सुरु केला. परंतु मला मुंबई पोलिसांची सिक्युरिटी असल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. गाडीचा फोटो दाखवत कंबोज म्हणाले की MH14BA5769 या गाडीतून माझा पाठलाग केला गेला. ही गाडी मोहिन शेखच्या नावावर आहे. या गाडीत सचिन कांबळे आणि काही अनोळखी लोक यात सहभागी होते. माझ्या सिक्युरिटीने यांना हटकल्यानंतर यांनी तिथून पळ काढला. त्या दिवशीच्या रात्री यांच्यावर रॅश ड्रायव्हिंगसाठी चालान कापल्याचेही पुरावे आहेत, असं कंबोज यावेळी म्हणाले.

त्यानंतर सचिन कांबळे याने एक खोटा व्हिडीओ तयार करत माझा रेस्टाॅरंटमधील व्हिडीओ त्याला जोडत राऊतांना पाठवला. राऊतांनी तो ट्वीट केला. त्यानंतर एक वेगळं नरेटिव्ह सेट केलं गेल्याचं कंबोज म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा :“आधी जेवून घ्या, मग बोलतो”; पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन )

असे अनेक आरोप माझ्यावर झाले आहेत. तसंच, अनेकदा माझ्यावर आत्मघाती हल्ले देखील झाले आहेत. मातोश्रीच्या बाहेरही तसाच प्रयत्न करण्यात आला. माझ्या कुटुंबालाही अनेक धकम्या दिल्या गेल्या. 10 दिवसांआधीच नितीन देशमुख यांनी मला खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची तक्रार मी सीपींकडे केल्याचंही कंबोज यावेळी म्हणाले.

सचिन कांबळे, मोहिन शेख आणि त्या मुलांचा राऊतांशी काय संबंध आहे याची चौकशी व्हायला हवी, असं कंबोज यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -