‘मोठे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे’, कंबोजांचा इशारा; ‘लवकरच मोठा खुलासा…’

अशी राजनीती करायची असेल तर मी काही व्हिडीओ समोर आणले तर राज्यातील मोठे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. तसंच, येत्या काळात काही मोठे खुलासे करणार असल्याचंही कंबोज यावेळी म्हणाले.

BJP leader Mohit Kamboj warned to Sanjay Raut on tweeted video
मी काही व्हिडीओ समोर आणले तर राज्यातील मोठे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. तसंच, येत्या काळात काही मोठे खुलासे करणार असल्याचंही कंबोज यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा करत, एक व्हिडीओ ट्वीट केला होता. मोहित कंबोज साडेतीन वाजचा बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, राऊतांवर पलटवार केला आहे. अशी राजनीती करायची असेल तर मी काही व्हिडीओ समोर आणले तर राज्यातील मोठे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. तसंच, येत्या काळात काही मोठे खुलासे करणार असल्याचंही कंबोज यावेळी म्हणाले. ( BJP leader Mohit Kamboj warned to Sanjay Raut on tweeted video )

कंबोज म्हणाले की, संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यापासून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना एका मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असं म्हणत त्यांनी व्हिडीओ प्रकरणावरुन राऊतांना चांगलच सुनावलं.

कंबोज म्हणाले की, मी जर व्हिडीओ दाखवणं सुरु केलं तर राज्यातील मोठ्या मोठ्या नेत्यांची मुलं तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. याला तुम्ही इशारा समजा किंवा धमकी समजा.

आदित्य, तेजस ठाकरेंचा तो व्हिडीओ माझ्याजवळ

आदित्य आणि तेजस ठाकरेंचा कोविड काळातला एक व्हिडीओ माझ्याकडे आहे असं म्हणत त्यांनी तो व्हिडीओ दाखवला. कोविड काळात जेव्हा रात्री 10 लाच हाॅटेल्स बंद होत होते तेव्हा उद्धव ठाकरेंची मुलं आदित्य, तेजस हाॅटेलवाल्यांना धमकावून हाॅटेल्स उघडायला लावायचे, तसचं, आमचा बाप मुख्यमंत्री आहे, असं सांगत ते धमकावायचे, असे अनेक व्हिडिओ माझ्याजवळ आहेत, असं कंबोज म्हणाले.

संजय राऊत कुठे फुकटच खातो, कोणाच्या बंगल्यात राहतो. काय करतो हे सांगितलं ना तर राऊत तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही, असं म्हणतक कंबोज यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख केला.

ज्या सचिन कांबळेने माझा व्हिडिओ राऊतांना पाठवला. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तसंच, माझ्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले, ते मात्र हे मविआ सिद्ध करु शकले नाहीत, ते सिद्ध करुन दाखवा, असं कंबोज म्हणाले. तसंच, येत्या काळात मी मोठा खुलासा करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्र हे बघत राहिल, असं म्हणत कंबोज यांनी इशारा दिला आहे.

( हेही वाचा: ‘माझा पाठलाग केला गेला’; हो मी मान्य…’त्या’ आरोपांवर मोहित कंबोज यांचा खुलासा )