मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय पोहोचवलं, यादी लवकरच…; राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

bjp leader narayan rane criticized uddhav thackeray on khoke sarkar remark

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद आता विकोपाला पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय़ राऊत आणि नारायण राणे यांच्यातही शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात ठाकरे गट विरुद्ध राणे कुटुंबीय अशी राजकीय कुस्ती रंगतेय. अशात काल भांडुपमध्ये कोकण महोत्सवात नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या कोकणी शैलीत उद्धव ठाकरेंवर जहरी टीकास्त्र डागले आहे. ठाकरे गटाकडून वारंवार शिंदे फडणवीस सरकारला खोके सरकार म्हणून हिणवले जात आहे. याच टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय पोहोचवले, याची यादी लवकरचं सांगू असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज शिवसेनेची काय अवस्था झाली हो. सेनेचे 40 आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत निघून जातात. शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहत बसले. उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात. शिवसेना रडणारी कधीच नव्हती. त्याला शिवसेना म्हणत नाही. शिवसेना ही लढणारी होती. आता कुठे गेले तुमचं सळसळत रक्त? दोन्ही हात सावरून घोषणा देत होतात, आता कुठे गेल्या तुमच्या घोषणा? तुम्ही दुसऱ्यांना खोके म्हणतात? तुम्ही खोके घेते नाही का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी मी जाहीर करेन की, मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं ते… असा थेट आव्हानचं राणे यांनी दिलं आहे.

यावर राणे पुढे म्हणाले की, आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या 15 व्या वर्षांपासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांच्या प्रेमासाठी आम्ही वेड होतो. आम्ही जीवची पर्वा न करता काम केले. आता तुमच्याकडे असलेले नेते म्हणजे संपादकाचा पण पगार घेतात, नेता म्हणून तोडबाजी पण करायची? असे काम मी केले नाही. आम्ही शिवसेनेसाठी त्याग केला, उद्धव ठाकरे आयते सत्तेवर अडीच वर्ष बसले, असा गंभीर आरोपही राणेंनी केला आहे.


ईडीच्या समन्सवर आयुक्त चहल यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘चौकशीला पूर्ण सहकार्य करणार’