घर महाराष्ट्र काळजी घ्या.. भाजपचा 'हा' बडा नेता इन्फ्लूएन्झा व्हायरसने ग्रस्त; क्षणात ताप भरतो...

काळजी घ्या.. भाजपचा ‘हा’ बडा नेता इन्फ्लूएन्झा व्हायरसने ग्रस्त; क्षणात ताप भरतो आणि…

Subscribe

एका माजी खासदाराला एन्फ्लूएन्झा व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी X या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती दिली.

मुंबई : कोरोनानंतर आता साथीच्या आजाराची देखील नागरिकांना भीती वाटू लागली आहे. साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये सुद्धा आता वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका माजी खासदाराला एन्फ्लूएन्झा व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी X या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची माहिती दिली. ते कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत नसतात. परंतु, या आजाराची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी त्यांनी याबाबतची पोस्ट टाकल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (BJP leader Nilesh Rane infected with influenza virus)

हेही वाचा – तुम्ही ‘इंडिया’चे नेतृत्व कराल? श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या प्रश्नावर ममता बॅनर्जींचे उत्तर, म्हणाल्या…

- Advertisement -

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्टमध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो. ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो. पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही.” असे निलेश राणे यांच्याकडून लिहिण्यात आले आहे.

कोरोनानंतर लोकांच्या मनामध्ये साथीच्या आजारांविषयीची चिंता वाढली आहे. कोणाला ताप जरी आला तरी डॉक्टरांकडून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे नागरिक आता आजारांविषयी अधिक सतर्क झालेले पाहायला मिळतात. परंतु माजी खासदार निलेश राणे यांना झालेला एन्फ्लूएन्झा व्हायरस नेमका आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया..

- Advertisement -

इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 च्या लक्षणांमध्ये ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याचबरोबर, असेही आढळून आले आहे की या आजारात उच्च ताप बरा झाल्यानंतरही कोरडा खोकला दीर्घकाळ टिकू शकतो. त्यामुळे या व्हायरस संदर्भातील लक्षणे असतील तर हस्तांदोलन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे असे निर्देश देण्यात आले आहेत. गर्भवती महिला, लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकार क्षमतेची कमतरता, वैद्यकीय आणि सर्जिकल आजार आणि दीर्घकालीन औषध उपचार सुरू असणाऱ्यांना या व्हायरसचा धोका अधिक असतो.

- Advertisment -