नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, ‘कोणतरी एक पर्यटक मुंबईवरून…’

बारसू रिफानरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, राज्यकर्त्याना या रिफानरीचे समर्थन करून दाखवण्याचे आव्हान दिले. ठाकरेंच्या याच आव्हानाला भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nitesh Rane told story that the Thackeray family only knew how to eat and travel free

बारसू रिफानरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, राज्यकर्त्याना या रिफानरीचे समर्थन करून दाखवण्याचे आव्हान दिले. ठाकरेंच्या याच आव्हानाला भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोणतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे. कोकणाला लागलेला खरा श्राप म्हणजे उद्धव ठाकरे आहेत’, अशा शब्दांत राणेंनी हल्लाबोल केला. (BJP leader Nitesh Rane Criticized Thackeray group leader Uddhav thackeray over Barasu Refinery)

“ग्रीन रिफायनरीला समर्थन करण्यासाठी जमलेलो आहोत. कोणतरी एक पर्यटक मुंबईवरून आलेला आहे. बारसू गावामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर उभे करू दिले नाही. त्यामुळे जैतापूरमध्ये कुठेतरी उभे केले आहे. बारसू गावामध्ये जाऊन काही लोकांशी बोलून पेटवापेटवीचे काम करून ते परत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यांनी जे भाषण केलं. त्याची मला माहिती मिळाली. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख कोणी द्यायची झाली तर, महाराष्ट्राचा सर्वात मोठा दलाल कोण असेल, तर आज तुमच्या रत्नागिरीतील बारसूमध्ये आलेला आहे”, असे नितेश राणे म्हणाले.

“भाषण देताना सांगितले की, पंतप्रधान मोदी मन की बात करतात ही भाषा कोणालाच कळत नाही. मागील 9 वर्षांपासून लोकांना मोदींची मन की बात समजते म्हणून त्यांनी पुन्हा निवडून दिले. पण उद्धव ठाकरेंना मन की बात समजतात की धन की बात समजतात हे आम्हाला सांगाव. ते पटावापेटवी करण्यासाठी नाही तर, आपल्या घरातील चूल पेटवण्यासाठी इथे आलेले आहेत”, असे नितेश राणे म्हणाले.

“काही दिवसांपूर्वी माहिती दिली की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे असे समर्थनार्थ पत्र काढलं. त्यानंतर आता विरोधी पक्षात असताना या ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचे सुचतंय. हा विचार नेमका कसा बदलला? हा विचार कोकणातील जनतेसाठी बदलेला नाही तर, खिशात पैसे येण्यासाठी आणि मातोश्रीवर खोके पोहोचण्यासाठी आले पाहिजे”, असेही नितेश राणे म्हणाले.

“आम्हाला समजलं की, उद्धव ठाकरे यांनी सत्ते असताना जे पत्र पंतप्रधानांना दिले त्याची किंमत 100 कोटी रुपये होती. ते 100 खोके स्वत:च्या मातोश्रीवर पोहोचले पाहिजे यासाठी पत्र व्यवहार केला होता. आज उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कोकणात आले. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा कुटुंबियांचा नेमका व्यवसाय काय आहे? कुठला धंदा, व्यवसाय ते करत आहेत? कोकणाला लागलेला खरा श्राप म्हणजे उद्धव ठाकरे आहेत”, असेही नितेश राणे म्हणाले.


हेही वाचा – बारसू रिफायनरी वाद : ‘हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न कराल तर…’, उद्धव ठाकरेंचा इशारा