राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्याव-म्याव आवाज येतोय; नितेश राणेंचा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना टोला

महाराष्ट्रात काही दिवसांपासून दौरे काढले जात आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सतत म्याव-म्याव आवाज माझ्या कानी पडतोय, असा टोला भाजपा (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना (Shiv sena) नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांना हाणला.

nitesh rane and aditya thackeray

“महाराष्ट्रात काही दिवसांपासून दौरे काढले जात आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सतत म्याव-म्याव आवाज माझ्या कानी पडतोय.”, असा टोला भाजपा (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना (Shiv sena) नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांना हाणला. तसेच, “हे म्याव-म्यावचे सगळेच आवाज बंद झाल्यानंतर वस्त्रहरण कसे होते हे आम्ही दाखवू”, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला. सध्या आदित्य ठाकरे राज्याच्या अनेक भागांत शिवसंवाद यात्रा काढत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना संबोधत बातचित करत आपला पाठिंबा कोणाला याबाबात चर्चा करत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात काही दिवसांपासून दौरे काढले जात आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सतत म्याव-म्याव आवाज माझ्या कानी पडतोय. हे म्याव-म्यावचे सगळेच आवाज बंद झाल्यानंतर वस्त्रहरण कसे होते हे आम्ही दाखवू. त्यामुळे मुद्दाम ट्विट केले आहे.”, नितेश राणे यांनी म्हटले.

“असेही म्हटले जातेय की, पक्षप्रमुख आजारी असताना गद्दारी केली. मग मुंबईचे लोक कोरोनामध्ये मरत होते. त्यावेळी मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटनमंत्री दिनूमोर्याच्या घरी काय करायचे. आपले वडिल आजारी आहेत. पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवणे तुम्हाला योग्य वाटले का? हा सवालही मी आदित्य ठाकरेंना विचारणार आहे”, असेही ते म्हणाले.

नितेश राणे (Nitesh Rane) मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) विरोधकांरती जोरदार टीका करीत आहे. विरोधकांचा नेहमी ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेत असतात. त्यानुसार आज सकाळी त्यांनी एक ट्विट करत नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याबाबत सांगितले आहे. “ज्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. माऊ माऊ संपू दे…मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु”, असेही त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा पुरवू नका अशी सुचना दिल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंनी अन्याय केला; शरद पवारांचा आरोप