घरमहाराष्ट्रहिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पुर्ण होणार नाही - गडकरी

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पुर्ण होणार नाही – गडकरी

Subscribe

नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकवेळ हिजड्याने लग्न केले तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पुर्ण होईल असे आम्हाला वाटत नव्हते. परंतु, भाजप सरकारने ते करुन दाखवले, असे नितीन गडकरी सांगली येथील शेतकरी मेळाव्यात म्हणाले.

सध्या वादग्रस्त विधानांमुळे केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच चर्चेत आले आहेत. रविवारी सांगली येथील एका शेतकरी मेळाव्यात नितीन गडकरी यांची पुन्हा जीभ घसरली आणि त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी ते सिंचण योजना विषयी बोलत होते. ते म्हणाले की, ‘एकवेळ हिजड्याने लग्न केले तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पुर्ण होईल असे आम्हाला वाटत नव्हते. परंतु, भाजप सरकारने ते करुन दाखवले. भाजप सरकारने सिंचन योजना पुर्ण करुन दाखवली’. सांगली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात टेंभू सिंचन योजनेसंदर्भात बोलताना त्यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना पुर्ण होईल असे आम्हालाही वाटत नव्हते. खरंतर असं इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पुर्ण होणार नाही. मात्र, भाजप सरकारच्या काळात ही योजना पुर्ण झाली. शेतकऱ्यांचे स्वप्न पुर्ण झाले. टेंभू सारख्या अनेक महत्त्वाच्या सिंचन योजना भाजप काळात पुर्णत्वास गेल्या असे गडकरी म्हणाले. तसेच या योजनांमुले दुष्काळाची दाहकताही कमी झाली, असेही गडकरी म्हणाले.

- Advertisement -

वादग्रस्त वक्तव्यांवरुन गडकरी चर्चेत

गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेचा विषय ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आपण जिंकून येऊ, याची आपल्याला शाश्वती आपल्याला नव्हती. जिंकूण यावे म्हणून काहीही आश्वासने आपण दिले होती. त्यात १५ लाख रुपयांचे एक आश्वासन. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ झाला होता. यावर त्यांनी स्वत: पत्रकार परिषद आयोजित करुन आपण असे काही म्हटलेच नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर गडकरी यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्याचे पाठराखण करणारे वक्तव्य केले होते, यावरही मोठी चर्चा रंगली होती. यानंतर त्यांनी आज पुन्हा एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -